नेटवर्कअभावी ब्राडबॅण्ड सेवा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:22 AM2021-07-24T04:22:02+5:302021-07-24T04:22:02+5:30
शहरात ५०० च्या वर ब्राॅडबॅण्ड सेवेचे ग्राहक आहेत तर मोबाइलधारकांची संख्या प्रचंड आहे. शहरासह तालुक्यात बीएसएनएलसह इतर कंपन्यांनी आपले ...
शहरात ५०० च्या वर ब्राॅडबॅण्ड सेवेचे ग्राहक आहेत तर मोबाइलधारकांची संख्या प्रचंड आहे. शहरासह तालुक्यात बीएसएनएलसह इतर कंपन्यांनी आपले टाॅवर उभे करून इतर कंपन्यांचे टाॅवर चांगले सेवा देत आहेत तर बीएसएनएलच्या नेटवर्कमुळे ही सेवा कुचकामी ठरत आहे. याबाबत ग्राहकांच्या नेहमीच तक्रार होतात; परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. शहरात अनेक बँका, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, व्यावसायिक, आधार केंद्र, आपले सरकार केंद्र इत्यादी ग्राहकाकडे ब्राॅडबॅण्ड सेवा आहेत त्यांना नेहमी नेटवर्क व स्पीडअभावी या सर्वांची कामे विस्कळीत होत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना व कंपनीच्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" करावे लागत आहे; मात्र नेटवर्क राहत नसल्याने त्यांना काम करणे फार कठीण होत आहे.