तुटलेला पूल नागरिकांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:14 AM2018-03-05T00:14:02+5:302018-03-05T00:14:02+5:30

गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेला धानोरा तालुक्यातील खांबाडा-मुस्का मार्गावर असलेल्या नदीवरील पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे.

The broken pool is dangerous for the citizens | तुटलेला पूल नागरिकांसाठी धोकादायक

तुटलेला पूल नागरिकांसाठी धोकादायक

Next
ठळक मुद्देखांबाडा-मुस्का मार्गावरील पुलाच्या समस्या : कडा पूर्णत: मोडकळीस

ऑनलाईन लोकमत
सुरसुंडी : गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेला धानोरा तालुक्यातील खांबाडा-मुस्का मार्गावर असलेल्या नदीवरील पूल नागरिकांसाठी धोकादायक ठरला आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ राहत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, आगामी पावसाळ्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खांबाडा - मुस्का या मार्गावर खोब्रागडी नदी आहे. पुलावरुन दिवसभरात अनेक वाहने मार्गक्रमण करीत असतात. या मार्गावरुन भाकरोंडी, रांगी, मानापूर, देलनवाडी, आरमोरीकडे दररोज शेकडो वाहने जात असतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरील पुलाची कडा मोडकळीस आलेली आहे. परंतु या पुलाच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. पावसाळ्यात तात्पूरती सोय म्हणून गावातील नागरीक मोडकळीस आलेल्या कडेवर मुरुम टाकत असतात. यामुळे थोडाफार धोका टळतो. परंतु पूर आल्यास परिस्थिती ‘जैसे थे’ निर्माण होते. यापूर्वी या कडेवरुन काही वाहने उलटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु सुदैवाने मोठा अपघात घडला नाही. परिसरातील लोकप्रतिनिधी नाममात्र असून नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. या मोडकळीस आलेल्या कडेची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
खांबाडा-मुस्का या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या अनेक समस्या सुरसुंडी भागात निर्माण झाले आहेत. या समस्यांबाबत काही नागरिकांनी प्रशासनाकडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीकडे गाºहाणे मांडले. मात्र पुलाच्या व रस्त्यांच्या समस्यांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही.
अनेक नागरिक योजनांपासून वंचित
केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक विभागामार्फत विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र सुरसुंडी भागात प्रशासनाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच अधिकारीही दौरे करून वस्तूस्थिती जाणून घेत नाही. एकूणच प्रशासकीय उदासीनतेमुळे या भागातील अनेक नागरिक शासनाच्या योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The broken pool is dangerous for the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.