बीआरएसपीचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:52 PM2018-03-26T22:52:44+5:302018-03-26T22:52:44+5:30

बहुजन समाजाचे प्रश्न, सुरजागड लोहपहाडीच्या परिसरातून होत असलेली लोहखनिजाची वाहतूक थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बीआरएसपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

The BRSP's front was hit by the District Collector | बीआरएसपीचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

बीआरएसपीचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व चर्चा : सरकारच्या नियोजनशून्य कारभाराबाबत नाराजी

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : बहुजन समाजाचे प्रश्न, सुरजागड लोहपहाडीच्या परिसरातून होत असलेली लोहखनिजाची वाहतूक थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बीआरएसपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व बीआरएसपीचे प्रदेशाध्यक्ष दशरथ मडावी, विदर्भ संयोजक प्रा.संजय मगर यांनी केले. तसेच बीआरएसपीचे प्रदेश सचिव विलास कोडापे, प्रदेश महासचिव भानारकर, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. कैलाश नगराळे, शहर अध्यक्ष मिलिंद बांबोळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पुरूषोत्तम रामटेके यांच्यासह बीआरएसपीचे अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्समार्गे आक्रोश मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी बीआरएसपीच्या प्रमुख पदाधिकाºयांनी विद्यमान सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शासनकर्त्या विरोधात नारेबाजी केली. बहुजनांच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्याशी बराच वेळ चर्चाही करण्यात आली.
लोहखनिजाचा कारखाना गडचिरोली जिल्ह्यातच उभारण्यात यावा, या प्रकल्पात वर्ग १ ते ४ पर्यंतची सर्व पदे जिल्ह्यातील युवकांमधून भरावी, मायनिंग ट्रेनिंग सेंटरची सुविधा करावी, अहेरी जिल्हा व आष्टी तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.

Web Title: The BRSP's front was hit by the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.