बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:18 AM2018-11-15T01:18:00+5:302018-11-15T01:18:34+5:30
भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.
दोन वर्ष उलटूनही बीएसएनएलचा तिसरा वेतन करार लागू झाला नाही. सदर वेतन करार लागू करण्यात यावा, इतर दूरसंचार कंपन्याप्रमाणे बीएसएनएलला ४-जी स्पेक्ट्रम देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनआयोगाचा लाभ द्यावा, दुसऱ्या वेतन आयोगातील त्रुटी दुरूस्त करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली. सदर मागण्या निकाली न निघाल्यास बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी ३ डिसेंबरपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत.
याबाबतची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद रामटेके, किशोर कापगते, केशव वऱ्हाडे, यशवंत गोन्नाडे यांनी केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनधोरणाविरोधात घोषणाबाजी केली.