गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळले बीएसएनएलचे टॉवर; यंत्रणा निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:19 AM2017-12-12T10:19:20+5:302017-12-12T10:19:49+5:30

BSNL tower burned by Gadchiroli naxalites; System failure | गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळले बीएसएनएलचे टॉवर; यंत्रणा निकामी

गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळले बीएसएनएलचे टॉवर; यंत्रणा निकामी

Next
ठळक मुद्देभारत बंद पाळण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसेंबरला भारत बंद पाळण्याचे आवाहन केले.
ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. परंतु याची माहिती सकाळपर्यंत पोलीस किंवा बीएसएनएलला मिळाली नव्हती. टॉवरचे सिग्नल मिळत नसल्यामुळे बीएसएनएलच्या गडचिरोली कार्यालयाने सोमवारी सकाळी आपल्या अभियंत्याला पाहणीसाठी पाठविले.
दरम्यान पोलिसांनीही बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. नक्षल्यांनी तिथे लावलेले बॅनर दुपारपर्यंत कायम होते. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन नक्षली बॅनर काढले.

Web Title: BSNL tower burned by Gadchiroli naxalites; System failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.