बौद्ध धम्म शोषण थांबवू शकतो

By admin | Published: May 17, 2017 01:25 AM2017-05-17T01:25:39+5:302017-05-17T01:25:39+5:30

बौद्ध धम्म तीन सिद्धांताची दीक्षा देतो. प्रज्ञा, करूणा आणि समतेच्या शिकवणीतून बौद्ध धम्म जगातील शोषण थांबवू शकतो,

Buddhist can stop the dharma exploitation | बौद्ध धम्म शोषण थांबवू शकतो

बौद्ध धम्म शोषण थांबवू शकतो

Next

नसीर जुम्मर शेख : देसाईगंजात समाज प्रबोधन कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : बौद्ध धम्म तीन सिद्धांताची दीक्षा देतो. प्रज्ञा, करूणा आणि समतेच्या शिकवणीतून बौद्ध धम्म जगातील शोषण थांबवू शकतो, असे प्रतिपादन नसीर जुम्मर शेख यांनी केले.
देसाईगंज येथील धम्म भूमीत नुकत्याच पार पडलेल्या समाज प्रबोधन मेळाव्यात ते प्रमुख वक्त म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रेमदास मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास मैद, मुख्याध्यापक गोपाल रामटेके, भिवाजी सांगोळे, जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अंगुली माल ही एकांकिका सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. यशवंत मेश्राम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक रामटेके यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Buddhist can stop the dharma exploitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.