वसतिगृह निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:14+5:302021-06-25T04:26:14+5:30

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या ...

Build a hostel | वसतिगृह निर्माण करा

वसतिगृह निर्माण करा

Next

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. मागास विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.

जारावंडीच्या टॉवरची रेंज वाढवा

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. मोबाईलची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक नागरिकांनी मोबाईलची खरेदी केली आहे. जारावंडी परिसरातील जवळपास १० ते १२ किमी अंतरावरील गावकऱ्यांनीही मोबाईल खरेदी केले आहेत. मात्र, त्या गावांमध्ये कव्हरेज राहत नाही. बीएसएनएलचे सर्वाधिक ग्राहक ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे याठिकाणी रेंज वाढविल्यास ग्राहकांना सेवा मिळण्याबरोबरच बीएसएनएलला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल. त्यामुळे येथील बीएसएनएल टॉवरची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. माेबाईल सेवा नसल्याने प्रशासकीय कामेे सुद्धा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लाडज गावाचा विकास रखडला

देसाईगंज : अखंड चंद्रपूर जिल्हा असताना पावसाळ्यात बेटाचे स्वरूप येणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज या गावाचे १९६१-६२ या साली तेव्हाच्या आरमोरी तालुक्यात व आताच्या देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्रामपंचायतीमध्ये जुनी लाडज येथील ३९५ कुटुंबांना ९९९ हेक्टर जागेवर नवी लाडज येथे पुनर्वसित करण्यात आले. मात्र, मागील ६० वर्षांनंतर या पुनर्वसित गावांसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध सोयी सवलती व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

प्रवाशी निवारा दुर्लक्षितच

देसाईगंज : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीतून विसाेरा येथील वडसा, कुरखेडा या राज्यमार्ग ३१४ च्या कडेला प्रवाशांच्या साेयीसाठी प्रवाशी निवारा बांधण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या निवाऱ्याचे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. पाेस्टर चिकटविल्याने देखणे रूप खराब झाले आहे. परिणामी प्रवाशी निवाऱ्याचे बाहेर उन्हातान्हात उभे राहून विश्रांती घेणे पसंत करतात. प्रशासनाने सदर प्रवाशी निवाऱ्याची दुरुस्ती करावी. रंगरंगाेटी करून याला नवे रूप द्यावे, अशी मागणी या भागातील प्रवाशांकडून हाेत आहे. देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातील बऱ्याच प्रवाशी निवाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक निवाऱ्यांची छत वादळाने उडून गेले आहे. भिंती तुटफूट झाल्या आहेत.

Web Title: Build a hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.