मुंगनेर परिसरात भ्रमणध्वनी टाॅवर उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:37+5:302021-04-26T04:33:37+5:30

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेेडच्या वतीने जिल्हाभर भ्रमणध्वनी टाॅवर उभारण्यात आले. मात्र, दुर्गम भागात टाॅवर उभारणीकडे दुर्लक्ष झाले. काही टाॅवर ...

Build a mobile tower in Mungner area | मुंगनेर परिसरात भ्रमणध्वनी टाॅवर उभारा

मुंगनेर परिसरात भ्रमणध्वनी टाॅवर उभारा

Next

भारतीय दूरसंचार निगम लिमिटेेडच्या वतीने जिल्हाभर भ्रमणध्वनी टाॅवर उभारण्यात आले. मात्र, दुर्गम भागात टाॅवर उभारणीकडे दुर्लक्ष झाले. काही टाॅवर उभारण्यात आले व बॅटऱ्याही उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, मुंगनेर भागात भ्रमणध्वनी मनाेऱ्याचा अभाव आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी व दूरध्वनीधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उंच जागेचा आधार घेऊन संपर्क साधावा लागताे. या भागात बीएसएनएल व इतर खासगी कंपन्यांचा कव्हरेज नसल्याने संपर्काची समस्या बिकट बनली आहे. मुंगनेर परिसरात बाेदीनसह आठ ते नऊ गावे आहेत. या गावातील नागरिकांचा मुंगनेरशी अनेकदा संपर्क येताे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्याने कव्हरेजची समस्या अद्यापही सुटली नाही. या ठिकाणी टाॅवर उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Build a mobile tower in Mungner area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.