मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:49 PM2017-09-05T23:49:30+5:302017-09-05T23:49:55+5:30
कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, अशी मागणी कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा लोहंबरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोटगूल ते वाको या मार्गाचे डांबरीकरण करावे, कोटगूल ते सावरगाव मार्गाचे रूंदीकरण करून डांबरीकरण करावे, कोटगूल ते वाया बडीमाचे ते कोरची, कोटगूल-भटेगाव-बोरी मार्गाचेही डांबरीकरण करावे, ढोलडोंगरी येथील ३३ केव्ही विद्युत केंद्राचे काम अपूर्ण आहे. सदर काम तत्काळ पूर्ण करावे, नागपूर-अंतरगाव-तेलकांदड मार्ग दुरूस्त करावा, सोनापूर ते अमराईटोला मार्गाचे खडीकरण करावे, गडचिरोली-कोटगूल बस वाको गावापर्यंत न्यावे, कोटगूल हे मध्यवर्ती मोठे गाव आहे. त्यामुळे या गावात थ्री-जी सेवा सुरू करावी, खसोडा ते गोडरीदरम्यान असलेल्या पुलाचे बांधकाम करावे, प्रतापगड, नालेकल, बेतकाठी ही गावे कोरची पंचायत समितीला जोडावी, कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायती इंटरनेट केबलने जोडण्यात याव्या, प्राथमिक आरोेग्य केंद्र कोटगूल येथील रिक्तपदे भरावी, कर्मचाºयांच्या निवासस्थानांची दुरूस्ती करावी या मागण्या निवेदनातून केल्या आहेत.