कृषी महाविद्यालयाची इमारत पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:33 PM2017-11-27T23:33:19+5:302017-11-27T23:33:34+5:30
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे चंद्रपूर मार्गावर कोट्यवधी रूपये किंमतीची शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे चंद्रपूर मार्गावर कोट्यवधी रूपये किंमतीची शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. सदर इमारत बांधून चार वर्षांचा कालावधी आता पूर्ण होत आहे. मात्र या नव्या इमारतीत अद्यापही कृषी महाविद्यालय हस्तांतरित झाले नाही. परिणामी ही इमारत तसीच ओस पडून आहे.
गेल्या अनेक वर्षापासून गडचिरोली येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचा कारभार कृषी विज्ञान केंद्राच्या तोकड्या इमारतीतून सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील विद्यार्थ्यांचा कृषीविषयक शिक्षणाकडे आता कल वाढला आहे. विद्यार्थी संख्याही वाढली आहे. मात्र त्या तुलनेत सध्या हे महाविद्यालय भरत असलेली इमारत अपुरी पडत असल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांधकाम करणाºया कंत्राटदाराचे बिल प्रलंबित असल्याने या इमारतीचे हस्तांतरण संबंधित प्रशासनाकडे करण्यात आले नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.