सिरोंचात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:23 AM2019-03-28T00:23:29+5:302019-03-28T00:24:59+5:30

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील क्रीडा संकूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने मंगळवारी बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढले.

Bulldozer on an encroachment | सिरोंचात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

सिरोंचात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

Next
ठळक मुद्देनगर पंचायतीची कारवाइ : नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने व्यावसायिकांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील क्रीडा संकूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने मंगळवारी बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढले.
येथील क्रीडा संकुल परिसरात राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूलगत खुल्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता ११ व्यावसायिकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. नगर पंचायत प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी या व्यावसायिकांना अतिक्रमणाबाबत नोटीस बजाविली होती. अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र व्यावसायिकांनी या नोटीसची दखल घेतली नाही. मंगळवारी सकाळच्या सुमारास चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. नगर पंचायत प्रशासनाची ही कारवाई पाहून ११ पैकी ७ व्यासायिकांनी स्वत: पुढाकार घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढले.
चार व्यावसायिकांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढून साहित्य नगर पंचायतीत जमा करण्यात आले, अशी माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. यापुढेही अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार असून कोणताही गवगवा न करता ही मोहीम राबविणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
नगर पंचायत प्रशासनाने सदर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने क्रीडा संकुल परिसरातील दोन्ही बाजुकडील रस्ते आवागमनासाठी आता मोकळे झाले आहेत. नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

Web Title: Bulldozer on an encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.