अतिक्रमित झोपड्यांवर बुलडोजर चालविणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:07 AM2019-04-26T00:07:58+5:302019-04-26T00:08:22+5:30

चामोर्शी मार्गावरील सेमानाजवळील देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ मधील आमच्या खासगी जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार असून पोलीस संरक्षणात अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.

The bulldozer will run on encroached huts | अतिक्रमित झोपड्यांवर बुलडोजर चालविणारच

अतिक्रमित झोपड्यांवर बुलडोजर चालविणारच

Next
ठळक मुद्देसातबाराधारक शेतकऱ्यांचा निर्धार : देवापूर रिठमधील अतिक्रमणाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील सेमानाजवळील देवापूर रिठ येथील सर्वे क्रमांक ९५ मधील आमच्या खासगी जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले आहे. कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण होणार असून पोलीस संरक्षणात अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी दिला आहे.
माजी नगरसेविका निलिमा राऊत यांनी गरीब नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी सातबाराधारक शेतकºयांनी केला. शिवनगरमधील नागरिकांनीही कोणताही विचार न करता ४० ते ५० हजार रुपयात हजार ते १२०० फुट जागा ताब्यात घेतली. सदर अतिक्रमण अवैध असल्याची बाब शेतकºयांनी अनेक वेळा संबंधित अतिक्रमणधारकांना पटवून दिली. मात्र अतिक्रमणधारक मानण्यास तयार नाही. उलट आमच्याच तक्रारी करीत आहेत. जमिनीचा सातबारा आपल्याकडे आहे. त्यानुसार अतिक्रमणधारकांवर कायदेशीररित्या कारवाईसाठी कायदेशीर बाबी करणे सुरू आहे. कायदेशीर बाबी आटोपल्यानंतर लवकरच अतिक्रमित घरांवर बुलडोजर चालविला जाईल. यावेळी जे नुकसान होईल, त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकच जबाबदार राहतील, अशी माहिती शेतकºयांनी पत्रपरिषदेत दिली. पत्रकार परिषदेला मधुकर गुरनुले, गुरूदेव मोगरे, राजू मोगरे, अशोक मोगरे, वामन वाढई, रमाबाई वाढई, विलास वाढई, अरूण मोगरे, तुकाराम कारमेंगे, शांताराम कारमेंगे, माजी पोलीस पाटील बारसागडे यांच्यासह माजी पं.स. सदस्य अमिता मडावी आदी उपस्थित होते.

Web Title: The bulldozer will run on encroached huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.