गडचिराेली व कुरखेडातील सराफा दुकाने कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:40 AM2021-08-24T04:40:57+5:302021-08-24T04:40:57+5:30
गडचिराेली : केंद्र सरकारने सराफा व्यावसायिकांसाठी नवीन निर्णय घेतला असून, या निर्णयान्वये साेन्याच्या दागिन्यांवर हाॅलमार्किंग ॲडेन्टी काेड अनिवार्य केला ...
गडचिराेली : केंद्र सरकारने सराफा व्यावसायिकांसाठी नवीन निर्णय घेतला असून, या निर्णयान्वये साेन्याच्या दागिन्यांवर हाॅलमार्किंग ॲडेन्टी काेड अनिवार्य केला आहे. एचयूईडीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून, ही प्रक्रिया घातक आहे. या निर्णयाच्या विराेधात २३ ऑगस्ट राेजी साेमवारला गडचिराेली व कुरखेडा येथील सराफा व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवून निषेध केला.
जिल्हा सराफा असाेसिएशनच्या वतीने केंद्र शासनाच्या या निर्णयाचा विराेध करण्यात आला आहे. बीआयएसतर्फे आलेल्या हाॅलमार्क नियमाचे राष्ट्रीयस्तरावर सराफा असाेसिएशनद्वारे स्वागत करण्यात आले; पण अलीकडेच शासनाने बीआयएसद्वारे एचयूआयडी हा नवीन नियम तयार केला आहे. एचयूआयडीचे नियम ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी अयाेग्य आहे. सराफा व्यावसायिकांना याचा उपयाेग करण्यासाठी किचकट पद्धत आहे. एचयूआयडीची प्रक्रिया घातक असून, येथे ओळखचिन्ह नाही. दागिन्यांची सुरक्षा नाही. तसेच या नियामामुळे खरेदी केलेले दागिने बदलविण्याची तरतूद नाही. तसेच याबाबतचा डेटा गाेपनीयही राहत नाही. अशा या किचकट निर्णयाचा सराफा व्यापाऱ्यांनी विराेध केला आहे.
गडचिराेली येथील आंदाेलनात गडचिराेली जिल्हा सराफा असाेसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर बाेगाेजवार, सचिव नितीन हर्षे, गजानन येनगंधीलवार, सुधाकर येनगंधलवार, संजय देवाेजवार यांच्यासह सर्व सराफा व्यापारी सहभागी झाले होते.
बाॅक्स...
जिल्हाभरातून आंदाेलनाला समर्थन
सराफा व्यावसायांवरील केंद्र शासनाच्या अयाेग्य निर्णयाचा सराफा असाेसिएशनने विराेध केला असून, एकदिवसीय बंद पुकारला आहे. या एकदिवसीय बंदला जिल्ह्याच्या विविध भागातून सराफा व्यापाऱ्यांकडून समर्थन मिळाले आहे. यामध्ये आरमाेरी, चामाेर्शी, देसाईगंज, आलापल्ली, आष्टी, सिराेंचा, धानाेरा आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी समर्थन दिले आहे.