प्राण्यांजवळ फटाके फोडाल तर होईल तुरुंगवास; प्राण्यांची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:04 PM2024-10-30T15:04:07+5:302024-10-30T15:06:05+5:30

Gadchiroli : पक्ष्यांनाही त्रास वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा

Bursting firecrackers near animals will result in imprisonment; Take care of animals | प्राण्यांजवळ फटाके फोडाल तर होईल तुरुंगवास; प्राण्यांची घ्या काळजी

Bursting firecrackers near animals will result in imprisonment; Take care of animals

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
दिवाळीमध्ये फटाके मोठ्या प्रमाणात फटाके उडविली जातात. अनेकजण उत्साहात कुत्री, गायी व म्हशींच्या शेपटीला फटाके लावून उडवतात. प्राणी घाबरला की हसतात. पण असे करणे वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) अंतर्गत गुन्हा असून, तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.


अनेकवेळा फटाके फोडताना लोकांना इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र, आजूबाजूला असलेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मोठ्या आवाजाचे फटाके, यासोबतच प्रचंड धूर करणाऱ्या फटाक्यांमुळे ज्याप्रमाणे माणसावर विपरित परिणाम होतात. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या प्राण्यांवरही विपरित परिणाम होतात. अनेकवेळा जाणूनबुजून काही समाजकंटक मुक्या प्राण्यांना इजा होईल, अशा पद्धतीने फटाके फोडतात. त्यामुळे प्राण्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. 


प्राणी सैरावैरा पळाल्यास काय कराल? 
फटाक्यांच्या आवाजाने घाबरून अनेकवेळा कुत्रा आणि मांजर रस्त्यावर सैरावैरा धावू लागतात. त्यात त्यांचा अपघात होऊ शकतो. प्राणी संग्रहालय परिसराच्या बाजूला फटाके वाजवू नयेत. मोठ्या आवाजाचे फटाके सहसा फोडू नयेत. फटाके फोडताना कुत्रे किंवा मांजर झोपलेले असल्याने त्यांना उठवावे.


प्राणीही घाबरतात
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे घाबरून कुत्र्यांचे अंग थरथरणे, लाळ गळणे, शांत ठिकाणी लपून बसणे, मोठ्याने ओरडणे, उपाशी राहणे यासारखे प्रकार कुत्र्यांमध्ये दिवाळी सणादरम्यान दिसून येतात. तसेच आवाजामुळे अनेकदा पाळीव कुत्री घर सोडून पळून जातात.


"पेटवलेले फटाके कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या अंगावर टाकले जातात. यामुळे प्राणी गंभीर जखमी होतात. आनंदात दिवाळी साजरी करत असताना त्या प्राण्यांचा विचार करावा. फटाके फोडताना आजूबाजूला कोणी प्राणी आहेत का? हे पाहावे. शक्यतो प्राण्यांजवळ फटाके फोडणे टाळावे." 
- अजय कुकडकर, प्राणीमित्र, गडचिरोली

Web Title: Bursting firecrackers near animals will result in imprisonment; Take care of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.