बस व दुचाकीची टक्कर, पोलीस जवान जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:36 PM2019-02-25T22:36:11+5:302019-02-25T22:36:24+5:30
अहेरीकडून सिरोंचाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकी यांच्यात टक्कर होऊन दुचाकीस्वार पोलीस जवान जखमी झाल्याची घटना नागेपल्ली येथील शाळेसमोर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीकडून सिरोंचाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व दुचाकी यांच्यात टक्कर होऊन दुचाकीस्वार पोलीस जवान जखमी झाल्याची घटना नागेपल्ली येथील शाळेसमोर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
विश्वनाथ सुरज बंशी रा. अहेरी असे जखमी पोलीस जवानाचे नाव आहे. ते अहेरीच्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच-४०-६०९४) अहेरीवरून सिरोंचाकडे जात होती. विरूद्ध दिशेने दुचाकीने पोलीस जवान येत होता. त्याला वाचवण्याचा बस चालकाने प्रयत्न केला, पण दुचाकी एसटी बसवर जाऊन आदळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यात पोलीस जवान जखमी झाला.
दरम्यान याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाहनांचा ताफा जात होता. अपघात झाल्याचे समजल्यानंतर धर्मरावबाबा यांनी जखमी जवानाला वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. त्या वाहनातून जखमी जवानाला अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बबलू हकीम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यासाठी मदत केली. महामंडळाची बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोरून येत होती. डाव्या बाजूच्या छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्याकडे दुचाकी येत होती. दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून ती बसला जाऊन धडकली.