वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:39 AM2021-05-21T04:39:19+5:302021-05-21T04:39:19+5:30

वैरागडसह परिसरातील गावांमधून अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विशेष म्हणजे, येथे एक सेवानिवृत्त कर्मचारी बोगस डॉक्टर बनून घरोघरी पोहोचून ...

The business of bogus doctors in Jairagad | वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात

वैरागडात बोगस डॉक्टरांचा धंदा जाेमात

Next

वैरागडसह परिसरातील गावांमधून अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विशेष म्हणजे, येथे एक सेवानिवृत्त कर्मचारी बोगस डॉक्टर बनून घरोघरी पोहोचून रुग्णांवर उपचार करतो. याशिवाय काहीजण दवाखाने उघडून बसले आहेत. अशा बाेगस डाॅक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण पात्रतेची तपासणी करावी, अशी मागणी मागील वर्षात झाली होती; परंतु आरमोरीच्या तालुका आराेग्य अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने रुग्णांच्या जिवाशी आजही खेळ सुरू आहे. कोरोना तपासणीच्या भीतीने सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण तपासणी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावले आहे. रुग्णांकडून माेठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. सदर बाेगस डाॅक्टरांकडून रुग्णांच्या जिवाला धाेका असल्याने त्यांच्या वैद्यकीय शिक्षण पात्रतेची तपासणी करून रुग्णसेवा बंद करावी किंवा अशा बाेगस लाेकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई झाल्यास रुग्ण आपाेआप शासकीय रुग्णालयात जातील व काेराेना संसर्गाची साखळी ताेडता येईल, असे वैरागड येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: The business of bogus doctors in Jairagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.