रात्रीच्यावेळी बाइकस्वारांची धूम, या स्टंटबाजांना आवरणार काेण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:50+5:302021-08-02T04:13:50+5:30
दुपारच्या सुमारास या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तसेच वाहतूक पाेलिसांचाही पाहारा राहते. त्यामुळे सहजासहजी दिवसा स्टंटबाजी करीत नाही. मात्र ...
दुपारच्या सुमारास या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तसेच वाहतूक पाेलिसांचाही पाहारा राहते. त्यामुळे सहजासहजी दिवसा स्टंटबाजी करीत नाही. मात्र ९ वाजतानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी हाेते. अशावेळी काही युवक इंदिरा गांधी चाैक ते बसस्थानकापर्यंत वाहनांची शर्यत लावतात. यात वाहने प्रचंड वेगाने चालविली जातात. वाहनाचा वेग १०० किमी प्रती तासापेक्षाही अधिक राहते. तसेच एवढ्या वेगात स्टंटबाजी करताना वाहने वेळीवाकडी केली जातात. यात दुसऱ्या वाहनधारकाला धडक बसल्यास किंवा स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचेही नियंत्रण सुटून वाहन रस्त्यावर पडल्यास त्याचा मृत्यू हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
इंदिरा गांधी चाैक ते बसस्थानकापर्यंत लागते शर्यत
चामाेर्शी मार्गाचे काम सुरू आहे, तर आरमाेरी मार्गावर खड्डे पडले आहेत. सध्या गडचिराेली शहरातील धानाेरा ते मूल हा मार्ग प्रशस्त आहे. त्यातही इंदिरा गांधी चाैक ते बसस्थानकापर्यंतचा मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे युवक स्टंटबाजी करण्यासाठी व वाहनांची शर्यत लावण्यासाठी याच मार्गाची निवड करतात.
बाॅक्स
तर जिवावर बेतू शकते
- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. वाहन घसरल्यास त्या युवकाची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- स्टंटबाजी करणारे वाहन दुसऱ्या दुचाकी वाहनाला किंवा पायदळ व्यक्तीला धडकल्यास चुकी नसतानाही दुसऱ्याचा जीव जाऊ शकते.
- या युवकांवर कारवाई न झाल्यास असे प्रकार वाढीस लागू शकतात.
बाॅक्स
कारवाई करणार काेण
सायंकाळी ६ वाजतानंतर वाहतूक पाेलीस ड्युटी संपली म्हणून घराकडे परत जातात. त्यामुळे या युवकांवर कारवाई करणार काेण? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. त्यामुळेच रात्रीच्या सुमारास स्टंटबाजी करण्याचे प्रकार गडचिराेली शहरात वाढीस लागले आहेत.