चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:17 AM2019-05-09T00:17:16+5:302019-05-09T00:18:12+5:30

वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे गौणवनोपजाचे उत्पादन होत असते. या गौणवनोपज संकलन व विक्रीतून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असतो.

Buy gyanwanupa from four centers | चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी

चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी

Next
ठळक मुद्देजिल्हाभरातून ५५ क्विंटलची आवक : उमेदतर्फे सर्वाधिक खरेदी

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे गौणवनोपजाचे उत्पादन होत असते. या गौणवनोपज संकलन व विक्रीतून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत असतो. सन २०१८-१९ च्या हंगामात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत गौणवनौपज खरेदी योजनेअंतर्गत चार केंद्रावरून एकूण ५५ क्विंटल ८ किलो इतक्या वनोपजाची खरेदी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने विविध प्रकारच्या २६ गौणवनौपज वस्तू खरेदींसाठी प्रशासनाला मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे सदर गौणवनौपजाची खरेदी केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात कुरखेडा तालुक्यातील पुराडा, आरमोरी तालुक्यातील पिंपळगाव, अहेरी तालुक्यातील मन्नेराजाराम व हालेवारा या चार केंद्रांवरून गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली. पुराडाचे केंद्र उमेद तर्फे चालविण्यात आले. माविमतर्फे पिंपळगाव तर महामंडळाच्या आविका संस्थांमार्फत मन्नेराजाराम व हालेवारा या दोन केंद्रावरून गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली.
पुराडाच्या केंद्रावर १२ क्विंटल २५ किलो बेहडा या वनौपजाची तर पिंपळगावच्या केंद्रावर १ क्विंटल ८८ किलो एवढ्या तरोट्याची खरेदी करण्यात आली. अहेरी तालुक्याच्या मन्नेराजारामच्या केंद्रावरून १३ क्विंटल ७१ किलो बेहडा तसेच १ क्विंटल गुगुळ व दीड क्विंटल डिंकाची खरेदी करण्यात आली. हालेवाराच्या केंद्रावरून ८१ किलो हिरडा, २३.२५ क्विंटल बेहडा व १८ किलो करंज बियाणांची खरेदी करण्यात आली.
माविमतर्फे २.३८ क्विंटल, उमेदच्या केंद्रावरून ३८.९९ क्विंटल व आविका संस्थेमार्फत १३.७१ अशा एकूण ५५.०८ क्विंटल गौणवनोपजाची खरेदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून या जंगलात विविध प्रकारचे वनौपज मिळतात. यामध्ये आवळा, आंबा टोळी, करंजबी, एरंडी, चिंच बी, पांढरी मुसळी, बिबा, बेहडा, बाफडी, कडूनिंब बी, रिठा, काकडा, गुगुळ, झाडू गवत, मोहफुले, मोहाबिज आदी वनोपजांचा समावेश आहे. दुर्गम भागातील नागरिक जंगल परिसरात फिरून वनौपज गोळा करीत असतात. यातून अनेक महिला मजुरांना रोजगार प्राप्त होत असतो.
१ लाख ६३ हजारांचे चुकारे अदा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने ३८.९९ क्विंटल इतक्या हिरडा, बेहडा, गुगुळ, डिंक व करंज बी आदी वनौपजाची खरेदी करणत आली. याची किंमत १ लाख ४० हजार ४२२ रुपये आहे. आविका संस्थेमार्फत २० हजार ५६५ रुपये किमतीच्या बेहडा या वनोपजाची खरेदी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने २.३८ क्विंटल इतकी बेहडा, तरोटा या गौणवनौपजाची खरेदी करण्यात आली असून विक्री करणाऱ्या नागरिकांना २ हजार २५४ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आली.

Web Title: Buy gyanwanupa from four centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल