शहर विकास आराखड्यात बायपास रस्त्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:12 AM2017-09-12T00:12:30+5:302017-09-12T00:13:04+5:30

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे वाढलेले अपघात टाळण्यासाठी गडचिरोली शहराबाहेरून बायपास मार्ग तयार होणार आहे.

Bypass road is included in the City Development Plan | शहर विकास आराखड्यात बायपास रस्त्याचा समावेश

शहर विकास आराखड्यात बायपास रस्त्याचा समावेश

googlenewsNext
ठळक मुद्देट्रान्सपोर्ट टर्मिनल उभारणार : अपघात टाळण्यासाठी जड वाहनांची शहराबाहेरून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे वाढलेले अपघात टाळण्यासाठी गडचिरोली शहराबाहेरून बायपास मार्ग तयार होणार आहे. जडवाहतूक शहराबाहेरून वळविण्यासाठी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा समावेश शहर विकास आराखडयात करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळताच हे काम सुरु होईल, अशी माहिती नगर रचनाकार संजय बारई व न.प.मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांनी सोमवारी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिली.
समितीची त्रैमासिक बैठक सोमवारी (दि.११) जिल्हाधिकाºयांच्या दालनात झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.विपीन ईटनकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, अशासकीय सदस्य रु पराज वाकोडे आदींसह इतर समिती सदस्यांची उपस्थिती होती.
अपघातमुक्त रस्ते असावे यासार्ठी शक्य त्या बाबींचा अभ्यास करु न योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाºयांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हयात दोन ब्लँक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी याबाबत माहिती असणारे फलक सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लावण्यात आले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाºया चंद्रपूर-धानोरा आणि आरमोरी-सिरोंचा या मार्गावरील जड वाहने बायपास मार्गाअभावी शहराच्या इंदिरा गांधी चौकातून जातात. या ठिकाणी वाढलेल्या वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी होते. त्यामुळे जड वाहतूक शहराबाहेरु न वळविण्यासाठी धानोरा रोडवरील लांझेडापासून आरमोरी मार्गावर तसेच सिरोंचा व चंद्रपूर मार्गासाठी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. याचा समावेश शहर विकास आराखडयात करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या बायपास मार्गालगत ६.७५ हेक्टर क्षेत्रावर ट्रान्सपोर्ट टर्मिनल उभारण्याचाही प्रस्ताव आहे. याच्या उभारणीत नगरपालिका स्वत: किंवा शासन निधीतून बांधकाम करण्यासोबतच स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्यातून उभारणी करण्याच्या शक्यतेची तपासणी करु न या कामाला वेग देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिले.
समितीचे सदस्य सचिव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाही याची माहिती समितीला सादर केली.या समितीवर नव्याने नियुक्त सदस्य पत्रकार रुपराज वाकोडे यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले. बैठकीस बांधकाम विभाग, परिवहन विभाग, तसेच एस.टी.महामंडळाचे अधिकारी आदिंची उपस्थिती होती.
रस्त्यांवरील जनावरांना कोंडवाड्यात टाका
शहरातील महामार्गांवर मोठया प्रमाणावर मोकाट जनावरे फिरतात. रात्रीही ही जनावरे मार्गावरच बसून असतात. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. नगरपालिकेतर्फे जनावरे जप्त करून कोंडवाडयात टाकण्यात आली, मात्र त्यांचा ताबा घेण्यास कुणीही न आल्याने लिलाव देखील करण्यात आला. तरीही समस्या कायम आहे असे निदर्शनास आले आहे. येणाºया काळात अपघातांचा धोका टाळण्यासाठी रात्री या मार्गांवर दिसणारी सर्व जनावरे कोंडवाडयात टाकण्याची कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी नायक यावेळी म्हणाले.
गोपाळनगरात वाहनतळ हलविणार
रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी चंद्रपूर मार्गावर दुचाकी वाहनांच्या पार्किगमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून गोपाळनगर भागात पार्किंगची जागा शोधण्यात आली आहे. त्या ठिकाणी वाहनतळ हलविण्यात येणार आहे. याबाबतची कार्यवाही येणाºया रविवारपासून सुरु करण्यात येईल, असे न.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा निपाणे यांनी या बैठकीत सांगितले. त्यामुळे आता आठवडी बाजारासाठी येणाºया नागरिकांना आपली वाहने गोपाळनगराच्या वाहनतळावर ठेवावी लागेल.
अनधिकृत बस थांबे बंद करणार
आरमोरी मार्गावर असणार एस.टी.चे अनधिकृत थांबे तसेच चंदपूर रोडवरील मंदिराजवळचा थांबा यामुळे होणारी कोंडी थांबविण्यासाठी हे थांबे बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकरी नायक यांनी दिल्या. याचे पालन न झाल्यास एस.टी.बसवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

Web Title: Bypass road is included in the City Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.