बोगस बियाणे आढळल्यास करा या नंबरवर कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 03:21 PM2024-06-11T15:21:41+5:302024-06-11T15:22:07+5:30

तालुका स्तरावर कक्ष : भरारी पथकांची राहणार करडी नजर

Call this number if you find bogus seeds | बोगस बियाणे आढळल्यास करा या नंबरवर कॉल

Call this number if you find bogus seeds

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:
खरीप हंगामात खते, बियाणे व कीटकनाशके तसेच पीक कर्जासंबंधी तक्रारींसाठी कृषी विभागाकडून तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.


खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाते. तसेच खते व कीटकनाशकांची किमतीपेक्षा अधिक भावात विक्री काही कृषी केंद्र चालकांकडून केली जाते. यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह त्यांची आर्थिक लूटही केली जाते. या प्रकाराला आळा बसावा यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तक्रार निवारण कक्ष व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


पंचायत समिती स्तरावर यांचे भरारी पथक
पंचायत समिती स्तरावर गडचिरोली व मुलचेरा येथे प्रल्हाद पदा, धानोरा यादव पदा, आरमोरी व चामोर्शी येथे के. जी. दोनाडकर, वडसा येथे जितेंद तोडासे, कुरखेडा जितेंद्र गेडाम, कोरची येथे रेणू दुधे, अहेरी व भामरागड येथे मनीषा राजनहिरे, एटापल्ली येथे तुषार पवार व सिरोंचा येथे डेविड मेश्राम यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात बाराही तालुक्यांत कृषी विभागाच्या पथकांची करडी नजर राहणार आहे.

येथे साधावा संपर्क
जिल्हा भरारी पथकाला संपर्क करण्यासाठी कृषी विकास अधिकारी ९९२२३२०११६, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक ८६९८३८९७७३ तसेच जिल्हा तक्रार निवारण कक्षात ८२७५६९०१६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ०७१३२-२२२५९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

 

Web Title: Call this number if you find bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.