पशुधनाच्या ओळखीसाठी आधार बिल्ले मारण्याची माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:04+5:302021-04-25T04:36:04+5:30

चामाेर्शी तालुक्यात १९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी- १ चे १४ व श्रेणी-२ चे ५ दवाखाने आहेत. तालुक्यात ...

Campaign to kill base badges for livestock identification | पशुधनाच्या ओळखीसाठी आधार बिल्ले मारण्याची माेहीम

पशुधनाच्या ओळखीसाठी आधार बिल्ले मारण्याची माेहीम

googlenewsNext

चामाेर्शी तालुक्यात १९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी- १ चे १४ व श्रेणी-२ चे ५ दवाखाने आहेत. तालुक्यात १९४ गावे आहेत. जवळपास सर्वच गावांमध्ये जनावरे आहेत. तालुक्यातील बैल, गाय, म्हैस, वासरे, आदी पशुधनाची ओळख तयार करण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ५३ हजार ८६ पशुधनाला आधार बिल्ले मारून ओळख तयार करण्यात आली, तसेच लस टाेचण्यात आली असून, मार्च २०२० ते २०२१ पर्यंत हा कार्यक्रम पार पडला. तालुक्यात ४७ हजार ३० जनावरांवर औषधाेपचार, ४ हजार ३३५ जनावरांचे खच्चीकरण, १ लाख ६५ हजार २५० जनावरांचे लसीकरण, २ हजार ६४९ जनावरांची लहान शस्त्रक्रिया, ९९ मोठ्या शस्त्रक्रिया, १ हजार ७३० जनावरांचे कृत्रिम रेतन, ४ हजार २३६ जनावरांची गर्भधारणा तपासणी, ३ हजार ५८० जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली. तालुक्यात ४४० संकरित वासरांवर उपचार करण्यात आला. २६० कृती शिबिरे घेण्यात आली, तसेच २३६ शेतकऱ्यांना वैरण बियाणे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून वितरित करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना, शेतकऱ्यांना मानव विकास योजना व नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ देण्यात आला, अशी माहिती पशुधनविकास विस्तार अधिकारी डॉ. सागर डुकरे यांनी दिली.

===Photopath===

240421\24gad_4_24042021_30.jpg

===Caption===

जनावराचे लसीकरण करताना पशुधन विकास अधिकारी.

Web Title: Campaign to kill base badges for livestock identification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.