१३ पॉर्इंट रोस्टर रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:46 PM2019-02-14T22:46:50+5:302019-02-14T22:47:07+5:30

राज्य शासनाने २०० पार्इंट रोस्टर सिस्टिम रद्द करून १३ पॉर्इंट सिस्टिमचा अध्यादेश काढला आहे. यामुळे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी असलेल्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे १३ पार्इंटचा रोस्टर रद्द करावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे करण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.

Cancel the 13-point roster | १३ पॉर्इंट रोस्टर रद्द करा

१३ पॉर्इंट रोस्टर रद्द करा

Next
ठळक मुद्देकुलगुरूंना निवेदन : विद्यापीठासमोर धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाने २०० पार्इंट रोस्टर सिस्टिम रद्द करून १३ पॉर्इंट सिस्टिमचा अध्यादेश काढला आहे. यामुळे एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी असलेल्या जागा कमी होणार आहे. त्यामुळे १३ पार्इंटचा रोस्टर रद्द करावा, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे करण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करून कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासन स्वत: आरक्षण नाकारायचे काम करीत आहे. पूर्वीच्या २०० पॉर्इंट रोस्टर सिस्टिम प्रक्रियेत एससी, एसटी, ओबीसी यांचे एकूण ४९ टक्के आरक्षण असायचे. एकूण जागांपैकी निम्म्या जागा आरक्षित प्रवर्गासाठी राखीव असायच्या. जर एखादा उमेदवार मिळाला नाही तर दुसऱ्या डिपार्टमेंटमधील अतिरिक्त आरक्षित उमेदवारांची भरती करून कोटा पूर्ण केला जात होता. २०० पॉर्इंट रोस्टरद्वारे भरण्यात येणाºया विद्यापीठ, महाविद्यालयांच्या पदांमध्ये दर चवथी सीट ओबीसीला, सातवी सीट एससीला, १४ वी सीट ओबीला उपलब्ध होत होती. परंतु १३ पॉर्इंट रोस्टरमध्ये १३ सीट असल्यामुळे एसटी प्रवर्गासाठी आरक्षण मिळणार नाही. यामध्ये पहिली तीन पदे सामान्य, चवथे पद ओबीसी, पाचवे व सहावे पद समान्य, सातवे पद एससी, आठवे पद ओबीसी, पुन्हा ननवे व अकरावे पद सामान्य, बारावे पद ओबीसी, तेरावे पद सामान्य वर्ग अशा पद्धतीने भरती होणार आहे. यामध्ये एससी, ओबीसींवर अन्याय तर झालाच आहे. परंतु एसटी प्रवर्ग पूर्णपणे वगळल्या जाणार आहे. भाजपप्रणीत शासन मागासवर्गीय घटकांवर सातत्याने अन्याय करीत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनाचे नेतृत्त्व बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महासचिव सदाशिव निमगडे, उपाध्यक्ष मिलींद बांबोळे, सचिव तुषार भडके, संघरक्षित बांबोळे, सूरज खोब्रागडे, आशिष मेश्राम, प्रतीक डांगे, जितेंद्र बांबोळे, दीपक बोलिवार, विवेक बारसिंगे आदी हजर होते.

Web Title: Cancel the 13-point roster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.