विद्यार्थी विराेधी शैक्षणिक धाेरण रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:21+5:302021-08-13T04:41:21+5:30
निवेदन देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदन देताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, ज्युनिअर कॉलेज विभाग जिल्हाध्यक्ष राजेश ...
निवेदन देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदन देताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, ज्युनिअर कॉलेज विभाग जिल्हाध्यक्ष राजेश कात्रटवार, प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख, जिल्हा सचिव माध्यमिक विभाग विष्णू दुणेदार, मा रहीम पटेल, कार्याध्यक्ष अमरदीप भुरले, गुरुदास सोमनकर, संतोष मेंदाळे, संतोष कुळमेथे, रूपेश बारसागडे, सुरेश रेचनकर, प्रेमसुदा मडावी, संतोष बोबाटे, युवराज पुसतोडे, गणेश बावनकुळे, सुनील लोखंडे, रूपेश बुरामवार, वेंकटरमण गागापूरवार, प्रशांत म्हशाखेत्री, नरेंद्र उंदिरवाडे, सचिन धकाते, सुभाष कुळमेथे, नरेश गोंधळे, सतीश पवार, नरेंद्र उंदीरवाडे, खुशाल भुरसे आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
राज्यातील सर्व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना १०० टक्के वेतन सुरू करावे. रात्रशाळा व रात्र ज्युनिअर कॉलेज उद्ध्वस्त करणारा १७ मे २०१७ चा शासन निर्णय रद्द करावा, २८ ऑगस्ट २०१५ व ७ ऑक्टोबर २०१५ चे जाचक शासन निर्णय रद्द करा. शहरी भाग २५, ग्रामीण भाग २०, डोंगराळ भाग १५ विद्यार्थी तुकडीचा निकष कायम ठेवा, कला, क्रीडा व आयसीटी शिक्षकांचा संचमान्यतेत समावेश करा. सावित्री फातिमा शिक्षक कुटुंब स्वास्थ्य योजना त्वरित लागू करा. सध्या सुरू असलेली वेळखाऊ व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी शालार्थ आयडी देणारी संगणक प्रणाली शिक्षण उपसंचालक स्तरावर त्वरित रद्द करण्यात यावी. शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांना शालार्थ आयडी देण्याचे अधिकार द्यावेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सहाय्यक शिक्षक (परिविक्षाधीन) यांना किमान वेतन कायद्यानुसार १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.