सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया रद्द करा

By admin | Published: August 6, 2014 11:50 PM2014-08-06T23:50:21+5:302014-08-06T23:50:21+5:30

गोंडवाना विद्यापीठात २० सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी ११ जून २०१४ च्या शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ कायदा १९९४ नुसार नागपूर

Cancel Assistant Professorship Recruitment Process | सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया रद्द करा

सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया रद्द करा

Next

गोंडवाना विद्यापीठ : ओबीसी संघर्ष समितीची मागणी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात २० सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी ११ जून २०१४ च्या शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ कायदा १९९४ नुसार नागपूर विद्यापीठाच्या ३० एप्रिल १९९६ मधील क्रमांक २ च्या दिशानिर्देशाचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समितीने प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधीसूचना व अधिनियम तसेच १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा गोंडवाना विद्यापीठाला जशाचा तसा लागू करण्यात आला आहे. या संदर्भात ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुुनघाटे, उपाध्यक्ष रमेश भुरसे, सचिव प्रशांत वाघरे, ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव येलेकर यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सर्व बाबींची कायदेशीरत: तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी सुरेश मांडवगडे, प्रभाकर वासेकर, गोवर्धन चव्हाण, प्रा. राजेश कात्रटवार, बंडू शनिवारे, नंदू कायरकर, गोवर्धन चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cancel Assistant Professorship Recruitment Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.