सूरजागडच्या खाणीची लीज रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:15 AM2018-01-17T01:15:12+5:302018-01-17T01:15:25+5:30
एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज खाणीची लिज रद्द करून खोदकाम तत्काळ बंद करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील लोह खनिज खाणीची लिज रद्द करून खोदकाम तत्काळ बंद करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
एटापल्ली तालुक्यात सागवान, बिजा, मोहा, हिरडा, बांबू अशा अनेक प्रजातींचे वृक्ष आहेत. या वृक्षांपासून शासनाला कोट्यवधी रूपयांचा वार्षिक महसूल मिळतो. नागरिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. असे असतानाही शासनाने लॉयड्स मेटल, जिंदाल, अदानी, अंबानी, मित्तल यासारख्या उद्योगपतींच्या कंपन्यांना नाममात्र दरात लोह खनिजाच्या उत्खननाची लिज दिली आहे. लॉयड्स मेटल कंपनीने सुरू केलेल्या उत्खनन कार्यात कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. यामुळे शासनाना महसूल बुडाला आहे. त्याचबरोबर वनसंपत्तीचीही मोठी हानी झाली आहे. लोह खनिजाचे उत्खनन बंद करण्यासाठी एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटी तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा शासनाकडे निवेदन पाठविले. विनंती अर्ज केले. धरणे आंदोलन, मोर्चे व उपोषण अशी आंदोलने करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. एटापल्ली तालुक्यात प्रस्तावित असलेल्या व सुरू असलेल्या सर्वच लोह खनिज खाणींची लिज रद्द करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून पदाधिकाºयांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी जि. प. सदस्य तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय चरडुके, सुरेंद्र मडावी, आकाश मट्टामी, रोशन पदा, पंकज वड्डे, बंटी जुनघरे, रोशन मुळमा, गीता कोरचा, उषा गोटा, सुमन काळंगा, काजल गावडे, कोमल वड्डे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व एटापल्ली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.