बेडवरून उठताही येत नाही, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:33 AM2021-07-26T04:33:38+5:302021-07-26T04:33:38+5:30

मागील सहा महिन्यांपासून काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्वच नागरिक लसीकरण केंद्रावरच जाऊन लस घेत आहेत. मात्र वयाेवृद्ध ...

Can't even get out of bed, will be vaccinated at home soon | बेडवरून उठताही येत नाही, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस

बेडवरून उठताही येत नाही, लवकरच घरी येऊन दिली जाणार लस

Next

मागील सहा महिन्यांपासून काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सर्वच नागरिक लसीकरण केंद्रावरच जाऊन लस घेत आहेत. मात्र वयाेवृद्ध नागरिक, अपंग जे बेडवरून उठू शकत नाही किंवा दुचाकीवर बसू शकत नाही. अशा बहुतांश जणांनी लस घेतलीच नसल्याची बाब आराेग्य विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता या नागरिकांना त्याच्या घरी जाऊन लस देण्याचा निर्णय आराेग्य विभागाने घेतला आहे.

बाॅॅक्स

जवळच्या लसीकरण केंद्राला कळवावे लागेल

लसीकरण केंद्रापर्यंत जी व्यक्ती चालून जाऊ शकत नाही. अशा व्यक्तीच्या नातेवाईकाने याबाबतची माहिती संबंधित केंद्रावर जाऊन कळवावी लागेल. त्यानंतर संबंधित केंद्रप्रमुख घरी जाऊन काेराेनाची लस देण्याची व्यवस्था करणार आहेत.

काेट

मी ८० वर्षांचा आहे. मला चालत जाणे शक्य नाही. माझ्याकडे दुचाकी नाही. त्यामुळे मी लस घेतलीच नाही. आराेग्य कर्मचारी स्वत: लस देणार असतील तर ही याेग्य बाब आहे.

- विठ्ठल देशमुख, नागरिक

काेट

वयाेवृद्ध व चालू शकत नसलेल्या अपंग व्यक्तींना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला हाेता. तरीही काही नागरिक लसीकरणापासून वंचित असतील व ते लस घेणार असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी तसे जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कळवावे. संबंधित डाॅक्टर घरी जाऊन लस देण्याची व्यवस्था करतील.

डाॅ. समीर बन्साेडे, जिल्हा माता व बालसंगाेपन अधिकारी

बाॅक्स

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डाेज-२,७७,३३१

दुसरा डाेज-५४,४४७

६० वर्षांवरील

पहिला डाेज ५२,१४७

दुसरा डाेज १२,२६५

Web Title: Can't even get out of bed, will be vaccinated at home soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.