क्षमता १०० ची, भरती २५० वर बालके व माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:18+5:30

भरती झालेल्या महिला व बालकांनी फुल्ल राहत असलेल्या महिला व बाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता आहे. या रुग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत वर्ग-४ ची २४ व वर्ग-३ ची ५ पदे भरायची होती. मात्र यापैकी एकही पद भरण्यात आले नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना संबंधित कामाचे कौशल्य राहत नाही.

Capacity 100, Children and mothers admitted 250 | क्षमता १०० ची, भरती २५० वर बालके व माता

क्षमता १०० ची, भरती २५० वर बालके व माता

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । वर्षभर राहते गर्दी : चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगडमधील रुग्णांमुळे ताण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १०० खाटांची क्षमता असलेल्या महिला व बाल रुग्णालयात वर्षभर २५० पेक्षा गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके भरती राहतात. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असल्याने इतर कामांसाठी बांधण्यात आलेले इमारतीचे हॉल वॉर्ड म्हणून उपयोगात आणले जात आहेत. विशेष म्हणजे ही गर्दी वर्षभर कायम राहते.
गुंतागुंतीची प्रसूती, रक्तक्षय असलेल्या गरोदर मातांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून जिल्हास्तरावरील महिला व बाल रुग्णालयात रेफर केले जाते. जिल्ह्याबरोबच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यांसह छत्तीसगड राज्यातीलही काही महिला प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे सदर रुग्णालय नेहमीच फुल्ल राहते. महिला व बाल रुग्णांसाठी १०० खाटांची क्षमता असलेले स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय बांधण्यात आले आहे. मात्र हे रुग्णालय सुद्धा आता अपुरे ठरत आहे. दर दिवशी जिल्हाभरातून ६० ते ७० महिला प्रसूतीसाठी व १० ते २० बालके उपचारासाठी भरती होतात. प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या प्रकृतीप्रमाणे काही दिवस भरती ठेवावे लागते.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला
भरती झालेल्या महिला व बालकांनी फुल्ल राहत असलेल्या महिला व बाल रुग्णालयात कर्मचाऱ्यांची मात्र कमतरता आहे. या रुग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत वर्ग-४ ची २४ व वर्ग-३ ची ५ पदे भरायची होती. मात्र यापैकी एकही पद भरण्यात आले नाही. रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात आहे. मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांना संबंधित कामाचे कौशल्य राहत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काम करवून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी परिचारिकांची २० पदे मंजूर आहेत. मात्र रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर एवढ्या परिचारिका एकाच शिफ्टसाठी आवश्यक आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे तर प्रशासकीय अधिकाऱ्याचेही एक पद रिक्त आहे. येथील अधीक्षकाला लिपिकासह सर्वच जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. अपुरा कर्मचारी वर्ग, त्यातच रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अडीचपट अधिक आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

अपुºया कर्मचाºयांवर अधिक रुग्णांना सेवा देण्याची कसरत करावी लागत आहे. तरीही चांगली सेवा दिली जात आहे. शासनाने येथील रिक्तपदे भरावी, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. विशेष करून बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाची वर्ग-४ ची पदे भरणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने वॉर्ड वाढविले जात आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने या वॉर्डांमध्ये कर्मचाºयांच्या नियुक्त्या करताना चांगलीच कसरत होत आहे.
- डॉ.दीपचंद सोयाम, वैद्यकीय अधीक्षक, महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली

Web Title: Capacity 100, Children and mothers admitted 250

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.