कारवाफा बिट विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:12 PM2017-10-01T23:12:05+5:302017-10-01T23:12:15+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या ......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा बिटाने विजेतेपद पटकाविले तर भाडभिडी बिट उपविजेता ठरला. विजेता व उपविजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाला पारितोषिक वितरक म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. अध्यक्षस्थानी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार होते. विशेष अतिथी म्हणून वैैद्यकीय अधिकारी डॉ. शालिनी इटनकर, प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, छाया घुटके, नोडल अधिकारी आर. टी. निंबाळकर, सोनसरीचे मुख्याध्यापक ए. के. इस्कापे, अधीक्षक के. एस. जावळे उपस्थित होते. आदिवासी खेळाडू क्रीडागुणांनी निपूण असून विभागीय, राज्य, राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर हे खेळाडू चमकावे, यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.
अहवालवाचन इस्कापे, संचालन विरूटकर व संदीप दोनाडकर तर आभार वंजारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधीर शेंडे, अनिल सोमनकर, प्रमोद वरगंटीवार, वासुदेव कोडापे, मडावी, दब्बा, अलाम, कन्नाके, शोभा गेडाम, नीलू उसेंडी, गौरकार, मिसार, व्ही. जी. चाचरकर, गिरी, वंदना महल्ले, आय. एम. दोनाडकर, कटरे, हेडो, शंभरकर, मोटघरे, सतीश पवार, प्रेमिला दहागावकर, सुधीर झंझाळ, कोरचा, तुमसरे, बहिरवार, बावनथडे, कुमरे, नाईक, राठोड, बरडे, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांंनी सहकार्य केले.
प्रकल्पस्तरीय विजेता व उपविजेता
क्रीडा संमेलनात पाच बिटातील २४ शासकीय व १८ अनुदानित शाळांतील खेळाडूंनी भाग घेतला. या संमेलनात कारवाफा संघाने ३४३ गुण मिळवित विजेतेपद तर भाडभिडी संघाने २९७ गुण प्राप्त करीत उपविजेतेपद पटकाविले. कारवाफा बिटात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही, गडचिरोली येथील शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित आश्रमशाळाचा समावेश आहे. कारवाफा संघाने १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक, याच गटात खो- खो स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला.
उपविजेता भाडभिडी संघाने १४ वर्ष वयोगटात मुला-मुलींच्या कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक, मुलांच्या व्हॉलिबॉल व मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, १७ वर्ष वयोगटात मुलींच्या खो- खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, १९ वर्ष वयोगटात मुलांच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.