मुलांमध्येही वाढताेय काेराेनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:36 AM2021-04-06T04:36:02+5:302021-04-06T04:36:02+5:30
काेराेनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर व्यवहारांवरील बंधणे काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. तसेच शाळाही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे नागरिक ...
काेराेनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर व्यवहारांवरील बंधणे काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. तसेच शाळाही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे नागरिक व विद्यार्थी बिनधास्त वागायला लागले. याचा परिणाम म्हणजे जानेवारी महिन्यापासून पुन्हा काेराेनाची दुसरी लाट सुरू झाली. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण १ हजार ९१६ नवीन काेराेनाबाधित आढळून आले आहेत. यात १ वर्षाच्या आतील २ बालके, १ ते १० वर्षे वयाेगटातील ६०, तर ११ ते २० या वयाेगटातील ३४९ मुले काेराेनाबाधित झाली आहेत. पूर्वीच्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बालके बाधित हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण व्यक्तीच्या तुलनेत लहान बालकांची राेगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यांना औषध देणेही अतिशय कठीण काम असते. त्यामुळे त्यांना काेराेनामुक्त करताना डाॅक्टरांना चांगलीच कसरत करावी लागते. या सर्व अडचणी लक्षात घेता त्यांना काेराेनाची बाधा हाेणार नाही यासाठी पालकांनी याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
बाॅक्स
ही आहेत मुख्य कारणे
लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांसाेबतच बालकेही बिनधास्त वागू लागली.
बाहेर जाताना ते मास्क वापरणे, गर्दीपासून दूर राहणे, वेळाेवेळी हात धुणे यासारखी काळजी घेत नसल्याने त्यांना काेराेनाचा संसर्ग वाढला आहे.
पाचवीनंतरचे सर्वच वर्ग सुरू करण्यात आले. वसतिगृहेही सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही काेराेनाची बाधा झाली आहे.
स्तंभालेख
जानेवारी ते एप्रिल महिन्यातील बाधित बालके
०-१ वर्ष -२
१-१० वर्ष-६०
११-२० वर्ष-३४९
पाच दिवसांत काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या
साेमवार-३६
रविवार-६८
शनिवार-५६
शुक्रवार-३९
गुरुवार-६८
एकूण बाधित
११०५०