आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांच्या काेराेना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:46+5:302021-02-14T04:34:46+5:30
गडचिराेली : काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख २६ हजार २२ नागरिकांच्या काेराेना टेस्ट ...
गडचिराेली : काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून ते ११ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख २६ हजार २२ नागरिकांच्या काेराेना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९२७ टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या आहेत. टेस्टचे प्रमाण वाढविल्याने काेराेनावर नियंत्रण मिळवता आले आहे. काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत जिल्ह्यात काेराेनाच्या टेस्टची प्रयाेगशाळा गडचिराेली येथे नव्हती. त्यावेळी संपूर्ण नमुने नागपूर येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी नेले जात हाेते. प्रत्यक्ष अहवाल प्राप्त हाेण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत हाेता. ताेपर्यंत संबंधित रुग्ण अनेकांच्या संपर्कात येत हाेता. काेराेनाचा अहवाल लवकर प्राप्त व्हावा, यासाठी शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात काेराेना तपासणीची स्वतंत्र प्रयाेगशाळा तयार करून दिली. याच कालावधीत रॅपिड ॲण्टीजेन टेस्टचाही वापर सुरू झाला. तसेच काही प्रमाणात ट्यूनाॅटचाही वापर केला जात हाेता. रॅपिड ॲण्टीजेनचा अहवाल तत्काळ प्राप्त हाेत हाेता. त्यामुळे या टेस्टचा वापर सर्वाधिक करण्यात आला. तसेच प्रयाेगशाळेत आरटीपीसीआर ही टेस्ट केली जात आहे. वेळीच अहवाल प्राप्त झाल्याने काेराेनावर नियंत्रण ठेवणे आराेग्य विभागाला शक्य झाले आहे.
बाॅक्स....
जिल्हा प्रयाेगशाळेत १५ हजार तपासण्या
गडचिराेली जिल्हा रुग्णालयात जवळपास जुलै महिन्यात काेराेनाच्या टेस्टची स्वतंत्र प्रयाेगशाळा तयार करण्यात आली. या प्रयाेगशाळेत आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातात. प्रयाेगशाळा निर्मितीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत १५ हजार १५२ टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक हजार ८६९ टेस्ट पाॅझिटिव्ह आल्या आहेत.
बाॅक्स....
पुरेसा कर्मचारी वर्ग
नमुन्याची तपासणी वेळेवर व्हावी, यासाठी या प्रयाेगशाळेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. आता काेराेनाच्या टेस्ट कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.
बाॅक्स....
काेराेनाच्या तपासण्या
प्रकार
एकूण पाॅझिटिव्ह निगेटिव्ह
आरटीपीसीआर ३३,६२० ३,०२९ २९,९९४
ट्यूनाॅट १,६३७ १२९ १,४९४
रॅट ९१,१२४ ५,७८९ ८५,८३३
एकूण १,२६,०२२ ८,९२७ १,१७,३२१