दोन लाख ज्येष्ठ नागरिकांना देणार काेराेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:09+5:302021-02-27T04:49:09+5:30
आराेग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. वयाेवृद्ध असलेल्या नागरिकांची राेगप्रतिकारक्षमता कमी राहते. तसेच ...
आराेग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. वयाेवृद्ध असलेल्या नागरिकांची राेगप्रतिकारक्षमता कमी राहते. तसेच बीपी, शुगर आदींचा त्रास राहतो. अशा व्यक्ती काेराेनाच्या सर्वाधिक बळी पडल्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे आराेग्य विभाग व इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपत आले असताना, ६० वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्याची एकूण लाेकसंख्या जवळपास १३ लाखाच्या घरात आहे. त्यातील १५ टक्के नागरिकांचे लसीकरण यामुळे पूर्ण होईल.
बाॅक्स .......
प्रत्येक पीएचएसीत राहणार लसीकरण केंद्र
सद्यस्थितीत प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवर आराेग्य कर्मचारी, पाेलीस, पंचायत विभागाचे कर्मचारी यांना लसीकरण केले जात आहे. १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस द्यायची आहे. प्रत्येक तालुक्यात ज्येष्ठांची संख्या जवळपास २० हजार आहे. ज्येष्ठांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरण केंद्र राहणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात एकूण ४५ पीएचसी आहेत.
काेट ......
६० वर्षे वयाेमान झाल्यानंतर राेगप्रतिकारक्षमता कमी हाेते. अशा व्यक्तींना काेराेनाची बाधा झाल्यास त्या मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. मृतांमध्ये ज्येष्ठांचेच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठांसाठी लसीची आवश्यकता हाेती.
- शिवराम नराेटे, ज्येष्ठ नागरिक
काेट .......
ज्येष्ठांना लसीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी याेग्य ते नियाेजन करून जिल्हाभरातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ द्यावा.
- रामदास बाेबाटे, ज्येष्ठ नागरिक
काेट ......
लस मिळण्यासाठी नेमके काय करावे लागते, याबाबतची माहिती आपल्याला नाही. काेराेनाचा सर्वाधिक धाेका शहरी भागातील नागरिकांना आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना लस देताना प्राधान्य देण्याची गरज आहे.
- आत्माराम मेश्राम, ज्येष्ठ नागरिक