काेराेनाचा काेप, अंत्यसंस्कारावर नगर परिषदेचे १९ लाख रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:44 AM2021-06-09T04:44:43+5:302021-06-09T04:44:43+5:30
काेराेना विषाणूची संसर्ग करण्याची पातळी अतिशय जास्त असल्याने काेराेनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतेवेळी इतरांनाही त्याची बाधा हाेण्याची शक्यता राहते. तसेच ...
काेराेना विषाणूची संसर्ग करण्याची पातळी अतिशय जास्त असल्याने काेराेनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतेवेळी इतरांनाही त्याची बाधा हाेण्याची शक्यता राहते. तसेच सुरुवातीच्या कालावधीत काेराेनाची भीती माेठ्या प्रमाणात असल्याने मृतकाचे नातेवाईक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता नगर परिषदेच्या मदतीने गडचिराेली येथेच अंत्यसंस्कार करीत हाेते. काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील ७२७ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी ३४६ नागरिकांवर अंत्यसंस्कार गडचिराेलीत करण्यात आले आहेत. अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे नातेवाईकच आणून देत हाेते. मात्र पीपीई किट, सॅनिटायझर, शववाहिकेच्या डिझेलचा खर्च, कर्मचाऱ्यांची मजुरी यावर गडचिराेली नगर परिषदेचे सुमारे १९ लाख रुपये खर्च झाले आहेत.
बाॅक्स
आठ मृतदेहांवर नगर परिषदने केले अंत्यसंस्कार
आठ मृतकांचे नातेवाईक अंत्यसंस्कारास येण्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नगर परिषदेनेच अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यविधीसाठी लागणाऱ्या काड्यांचा खर्चही नगर परिषदेनेच उचलला आहे.
बाॅक्स
१२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- अंत्यविधीसाठी गडचिराेली नगर परिषदेने सुरुवातीला सहा कर्मचारी नेमले हाेते. मात्र दुसऱ्या लाटेत मृतकांची संख्या वाढली. त्यामुळे बारा कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना नगर परिषदेमार्फत जवळपास ५५० रुपये मजुरी दिली जात हाेती. त्यांच्या मजुरीवरच बराच खर्च झाला आहे.
- गडचिराेली नगर परिषदेकडे एकच शववाहिका आहे. दुसऱ्या लाटेत मृतकांची संख्या वाढल्याने एटापल्ली येथील शववाहिका मागविण्यात आली.
काेट
अंत्यसंस्कारासाठी मृतकाचे नातेवाईक येत हाेते. मात्र ते दूरच उभे राहत हाेते. त्यामुळे काही वेळेला अंत्यविधीची प्रक्रिया नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाच पार पाडावी लागत हाेती. असा प्रसंग आपण पहिल्यांदाच अनुभवला आहे. काेराेनाने आपल्या लाेकांनाही परके करून साेडले.
- अनिल गाेवर्धन, आराेग्य अधिकारी, नगर परिषद, गडचिराेली
बाॅक्स
एकूण काेराेनाबाधित- २९६६४
बरे झालेले- २८५१५
उपचार घेत असलेले- ४२२
एकूण मृत्यू- ७२७
डेथ रेट- २.४५