सरकारीसाेबतच दाेन खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 AM2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:32+5:30
गडचिराेली जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये माेफत काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. काही नागरिक मात्र सरकारी दवाखान्यात जाऊन लस घेण्यास इच्छुक नाहीत, अशा नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मात्र २५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आता जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाेबतच गडचिराेली शहरातील धानाेरा मार्गावरील सिटी हाॅस्पिटल व चामाेर्शी मार्गावरील धन्वंतरी हाॅस्पिटल या दाेन खासगी रुग्णालयांमध्ये १ मार्चपासून काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. याबाबतचे नियाेजन जिल्हा आराेग्य विभागाने करण्यास सुरुवात केली आहे.
गडचिराेली जिल्ह्यात ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले जवळपास २ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या सर्वांना जिल्हाभरातील सरकारी दवाखान्यांमध्ये माेफत काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध हाेणार आहे. काही नागरिक मात्र सरकारी दवाखान्यात जाऊन लस घेण्यास इच्छुक नाहीत, अशा नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मात्र २५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. केंद्र शासनाने देशभरातील खासगी रुग्णालयांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये गडचिराेली शहरातील सिटी हाॅस्पिटल व धन्वंतरी हाॅस्पिटल यांचा समावेश आहे. ही दाेन्ही रुग्णालये यापूर्वी महात्मा फुले जनआराेग्य याेजनेशी संलग्नित हाेती.
ऑन द स्पाॅट किंवा ॲपवर करता येणार नाेंदणी
काेराेनाची लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची नाेंदणी हाेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र ॲप तयार केले आहे. तसेच ज्या रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा नाेंदणी करता येणार आहे.
नाेंदणी करतेवेळी वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मदाखला आदी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत. इतरही कागदपत्रे चालतील. त्याची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याबाबतचे डाॅक्टरांचे नुकतेच काढलेले प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. २० प्रकाराच्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. ते काेणते आजार आहेत, याची माहिती आराेग्य विभागाकडे उपलब्ध हाेणार आहे.
मंगळवारपासून लसीकरणाला येणार गती
केंद्र शासनाने १ मार्चपासून म्हणजेच साेमवारपासून लस उपलब्ध हाेईल, असे जाहीर केले आहे. मात्र, याबाबतचे नियाेजन करण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे साेमवारी दुपारनंतर लस उपलब्ध हाेऊ शकेल. मंगळवारपासून लसीकरणाला गती येईल, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.