बाेगस व बंद इलेक्ट्राॅनिक वजन काट्यांची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:52+5:302021-01-08T05:56:52+5:30
धानोरा : तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर इलेक्ट्रॉनिक ...
धानोरा : तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची चौकशी करून नवीन व चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदनाद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी आ. होळी यांच्या नेतृत्वात विविध धान खरेदी केंद्रावर आंदोलन करण्यात आले. दरम्यान धानोरा तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धान खरेदी प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. केंद्रावरील बोगस काट्यांचा पुरवठा करणाऱ्या व लवकर बंद पडलेल्या वजन काट्यांच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करून सबंधीतावर कारवाई करावी तसेच खरेदी केंद्रावर तातडीने नवीन वजन काटे उपलब्ध करावे, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.