‘त्या’ दाेन रुग्णालयांच्या संचालकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:00 AM2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:33+5:30
कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानाबाबतीत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी सांगीतले. त्यावरून त्याच दिवशी या दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकण्यात आले हाेते. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याने दाेन्ही रुग्णालयांविराेधात तहसीलदार संताेष महल्ले यांनी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : काेराेना रुग्णांवर उपचार करण्याची काेणतीही परवानगी नसताना त्यांच्यावर अवैधरीत्या उपचार करणाऱ्या देसाईगंज शहरातील आशा क्लिनिक व डाॅ. बुद्धे हाॅस्पिटल या दाेन रुग्णालयांना २ मे राेजी प्रशासनाने सील ठाेकले हाेते. या प्रकरणाची चाैकशी केल्यानंतर आशा क्लिनिकचे संचालक डाॅ. श्रीकांत रामजी बन्साेेड व डाॅ. बुद्धे हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. मनाेज मुरलीधर बुद्धे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देसाईगंज नगर परिषद हद्दीत अनाधिकृत कोविड रुग्णालय चालवित असल्याच्या गोपनीय माहितीवरून डॉ. मनोज बुद्धे यांच्या आशा क्लिनिक व गांधी वॉर्डातील डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या हॉस्पिटलची २ मे राेजी तपासणी केली असता दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण कोविड आजाराचा उपचार घेत असल्याचे आढळून आले.
कोविडग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या परवानाबाबतीत विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे दाेन्ही रुग्णालयांच्या संचालकांनी सांगीतले. त्यावरून त्याच दिवशी या दाेन्ही रुग्णालयांना सील ठाेकण्यात आले हाेते. चाैकशीत आराेप सिद्ध झाल्याने दाेन्ही रुग्णालयांविराेधात तहसीलदार संताेष महल्ले यांनी देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून डॉ. मनोज बुद्धे व डॉ. श्रीकांत बन्सोड यांच्या विराेधात भादंवि कलम १८८, २७९, २८० सहकलम ५१(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, सहकलम २,३ व ४, साथरोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक सोनम नाईक पुढील तपास करीत आहेत.
कारवाई झालेल्या दाेन्ही दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉंसेंट्रेटर, ऑक्सिजन मॉनिटर, ऑक्सिमीटर, फॅबिफ्यु गोळ्या, डॉक्झिसाक्लिन गोळ्या, ऑस्पिरिन गोळ्या, इव्हरमेक्टीन गोळ्या, ए हिस्ट -मोस्ट गोळ्या, अझीथ्रोमॉसिन गोळ्या, व्हिटॅमिन सी गोळ्या आढळून आल्या. एवढा माेठा साठा काेणत्या मेडिकलमधून आणण्यात आला, याचीही चाैकशी करण्याची मागणी देसाईगंजातील नागरिकांकडून हाेत आहे.
अहेरीतील रुग्णालयाला ठाेकले सील
अहेरी : येथील डाॅ. अमाेल पेशेट्टीवार यांच्या दवाखान्यात काेराेना रुग्णांवर अवैधरीत्या उपचार सुरू असल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयाला प्रशासनाने सील ठाेकले आहे. काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नसतानाही डाॅ. अमाेल पेशेट्टीवार हे काेराेना रुग्णांवर उपचार करीत असल्याची गाेपनीय माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी तालुका कोविड सनियंत्रण समितीने रुग्णालयाची तपासणी केली असता, तेथे एकूण सहा रुग्ण भरती असल्याचे आढळून आले. त्यांतील एक रुग्ण काेराेनाबाधित हाेता. त्यानुसार रुग्णालयाला सील ठाेकण्यात आली आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, अहेरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे, अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरी मंडल अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर पठाण, रोशन दरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.