वाघांना पकडून जंगलव्याप्त भागात साेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:36 AM2021-05-24T04:36:05+5:302021-05-24T04:36:05+5:30
वाघाने हल्ला करून ठार केलेल्या दिभना गावातील वंदना जेंगठे या महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. यापूर्वी या ...
वाघाने हल्ला करून ठार केलेल्या दिभना गावातील वंदना जेंगठे या महिलेच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. यापूर्वी या परिसरात काही महिन्यांपूर्वी दाेन घटना घडल्या. दिभना, गाेगाव, महादवाडी, चुरचुरा, कुहाडी या परिसरात ३ ते ४ वाघांचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. या गावांमध्ये शेतकऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात असून गावाच्या सभाेवताच्या परिसरात शेती आहे. वाघाच्या दहशतीने शेतकरी धास्तावले आहेत. दिभना या गावातील महिला वंदना अरविंद जेंगठे, वय ४० ही काही महिलांसाेबत गावाजवळच्या जंगलात सरपण गाेळा करण्यास गेली असता वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. त्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशाेर पाेतदार व सहसंपर्क प्रमुख डाँ.रामकृष्ण मडावी यांच्या सुचनेनुसार शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सुनील पाेरड्डीवार व उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी दिभना गावात जाऊन जेंगठे परिवाराला आर्थिक मदत केली. त्यांनी सांत्वन करून जेंगठे कुटुंबीयाला धीर दिला. य़ावेळी ग्रा. पं. सदस्य धनराज जेंगठे, शिवसेनेचे शाखाप्रमुख दामाेदर गुरनुले, नरेश माेहुर्ले, शिवसैनिक नरेश चुटे, प्रवीण रामगीरवार, तसेच गावातील नागरिक हजर हाेते. वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही जिल्हा समन्वयक सुनील पाेरड्डीवार व पदाधिकाऱ्यांनी दिली.