नाला बांधकामाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:12 PM2018-08-12T23:12:30+5:302018-08-12T23:13:18+5:30

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.

Caterpillar damage | नाला बांधकामाने नुकसान

नाला बांधकामाने नुकसान

Next
ठळक मुद्देरोवणी केलेले धान पीक वाहून गेले : जिमलगट्टानजीकच्या किष्टापुरातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टानजीक असलेल्या किष्टापूर येथे शेतकरी मंगा सम्मा सिडाम या लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सन २०१६-१७ मध्ये माती नाला बांधकाम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या माती नाल्यात अतिरिक्त पाणी जमा झाल्यामुळे पाण्याचा दाब वाढला. परिणामी लगतच्या शेतीमध्ये पाणी साचले. रोवणी केलेले धानपीक वाहून गेले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहेत.
किष्टापूर येथील मुत्ता मदन सिडाम व मलय्या मदना सिडाम या शेतकºयांनी आपल्या शेतजमिनीत धान पिकाची रोवणी केली होती. ही शेती पूर्णपणे पाण्याखाली आल्याने त्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे. माती नाला बांधकाम करताना अतिरिक्त पाणी जाण्यासाठी सुविधा करणे आवश्यक होते. मात्र या नाल्याला वेस्टवेअर दिला नाही. त्यामुळे या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊन शेतकºयांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, सिंचन व वन विभागामार्फत कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. या कामासाठी शासनाकडून संबंधित विभागाला वार्षिक उद्दिष्ट प्राप्त होत असते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने अधिकारी नियोजन शुन्यतेने नाला व इतर बांधकाम करतात, हे या कामावरून दिसून येत आहेत. या बाबीची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केले बांधकाम
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी व लगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात न घेता माती नाला बांधकाम केले. अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्यतेमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याला अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप किष्टापूरचे सरपंच रोशन सिडाम यांनी केला आहे.

Web Title: Caterpillar damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.