वाघाच्या दहशतीमुळे सावधानतेचा फलक
By admin | Published: May 23, 2017 12:40 AM2017-05-23T00:40:46+5:302017-05-23T00:40:46+5:30
तालुक्यातील रवी परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे. सदर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने मागील आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.
नागरिकांना सूचना : वनाधिकारी व कर्मचारी सतर्क
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील रवी परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे. सदर वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने मागील आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र वाघ अजूनही सापडलेला नाही. या परिसरातील नागरिकांना वाघापासून सावध करण्यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला वाघ असल्याबाबतचे फलक लावले आहे.
रवी हे गाव आरमोरी-देसाईगंज मार्गावर आरमोरी पासून अगदी पाच किमी अंतरावर आहे. रवी गावाच्या सभोवताल जंगल आहे. देसाईगंज-आरमोरी हा जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आहे. कुरखेडा, कोरची, देसाईगंज येथील नागरिक गडचिरोलीकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ राहते. रात्री उशिरापर्यंत वाहनधारक ये-जा करतात. वाघाने मागील आठ दिवसांपासून रवी जंगलात आपले बस्तान मांडले आहे. वाघापासून ये-जा करणाऱ्यांना धोका होण्याची शक्तता नाकारता येत नाही. या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना वाघापासून धोका होवू नये. यासाठी वनविभागाने रवी गावाजवळील कॉ्रसिंगजवळ वाघ असल्याचे फलक लावलेला आहे. नव्यानेच लावलेला हा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.