सीसीटीव्ही कॅमेºयातून आता प्रवाशांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:28 AM2017-11-11T00:28:43+5:302017-11-11T00:29:06+5:30
येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे.
बसस्थानक परिसरात प्रवाशी, एसटी कर्मचाºयांची दिवसभर गर्दी राहते. त्यामुळे चोरीसह इतर अनुचित घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत होती. एसटी महामंडळाने राज्यातील जिल्हा स्थळावर असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावरही नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. कॅमेरे लावण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीच्या कर्मचाºयांनी दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी केली. एसटीच्या स्थानिक अधिकाºयांसोबत चर्चा करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित केली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये कॅमेरे लावले जाणार आहेत. कॅमेराची रेंज ८० मीटर आहे. आठ कॅमेरे फिक्स आहेत. तर एक कॅमेरा फिरणारा राहणार आहे. या संपूर्ण कॅमेराचे चित्रीकरण बसस्थानक प्रमुखांच्या कक्षात दिसणार आहे. प्रत्येक कॅमेराला १८० दिवसांचा बॅकअप देण्यात आला आहे. १८० दिवसांनंतर संबंधित कॅमेरातील डेटा दुसºया सीडीमध्ये अपलोड केल्यानंतर डिलिट केला जाणारा आहे. या कॅमेरांमुळे सहा महिन्यांपूर्वीचा डेटा सहज बघता येणार आहे.
नक्षल घटनांवर नियंत्रण
गडचिरोली जिल्हा नक्षल बाबत अतिशय संवेदनशील मानला जातो. नक्षलग्रस्त भागातूनही बसेस धावतात. बसस्थानकावर रात्रंदिवस गर्दी राहत असल्याने या गर्दीचा गैरफायदा नक्षल्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापूर्वीच गडचिरोली बसस्थानक परिसरात पोलीस चौकी निर्माण करण्यात आली. या चौकीमध्ये चार वर्षांपूर्वी काही दिवस पोलिसांची नेमणूक केली जात होती. त्यानंतर पोलिसांची नेमणूक करणे बंद केले असले तरी अजुनही पोलीस चौकी कायम आहे. बसस्थानक परिसरात लागलेल्या कॅमेरांमुळे नक्षल घटनांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. दोन कॅमेरे बाहेर व आत जाणाºया प्रवेशद्वारावर ठेवले जाणार असल्याने बसस्थानकातून बाहेर निघणाºया बसेसवरही नियंत्रण राहणार आहे.
इतरही बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे गरजेचे
प्रत्येक जिल्हास्थळावरील बसस्थानकावर कॅमेरे लावण्याचा निर्णय एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावर कॅमेरे लागणार आहेत. मात्र इतरही बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी राहत असल्याने या ठिकाणच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, आरमोरी, सिरोंचा, अहेरी व धानोरा या ठिकाणी बसस्थानक आहेत. या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.