अहेरीतील सीसीटीव्ही कॅमरे बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 12:35 AM2017-06-05T00:35:56+5:302017-06-05T00:35:56+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबरला अहेरी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराची सेवा सुरू करण्यात आली.
तीन महिने उलटले : थकीत बिलामुळे योजना पूर्णत: अयशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकाराने १५ आॅक्टोबरला अहेरी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराची सेवा सुरू करण्यात आली. मात्र नगर पंचायत प्रशासनाने ३० हजार रूपयांच्या वीज बिलाचा भरणा न केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून अहेरीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. नगर पंचायतीच्या उदासीनतेमुळे पालकमंत्र्यांनी आणलेली ही योजना पूर्णत: अपयशी ठरली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची सीसीटीव्ही कॅमेराची सेवा अहेरी शहरात बसविण्यात आली. अहेरी शहरात गर्दीच्या २४ ठिकाणांवर या कॅमेराची नजर राहत होती. सीसीटीव्ही कॅमेराचे सात वेगवेगळे मीटर अहेरी नगर पंचायतीच्या वतीने लावण्यात आले होते. या सातही मीटरचे मिळून जवळपास ३० हजार रूपयांचे बिल नगर पंचायतीला प्राप्त झाले. मात्र नगर पंचायतीने महावितरणकडे या वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराचा वीज पुरवठा महावितरणने २३ फेब्रुवारीला खंडीत केला. तेव्हापासून कॅमेरे बंदच आहेत.