आष्टीत अवैध वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:19+5:30

सुधीर फरकाडे । लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली ...

CCTV cameras monitor illegal traffic in Ashti | आष्टीत अवैध वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

आष्टीत अवैध वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

Next
ठळक मुद्देपोलिसांचा कडक पहारा । चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर लागले कॅमेरे

सुधीर फरकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. परिणामी लॉकडाऊन पुन्हा कडक करण्यात आले असून रेडझोनमधील नागरिक व दुसºया जिल्ह्यातील नागरिकांना मज्जाव करण्यासाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक अहेरी व उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे.
परजिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर व आवागमन करणाऱ्या वाहनांवर या सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर राहणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून केवळ भाजीपाला, किराणा, औषधी, अंडी, दूध, मांस, मटन, बी-बियाणे व किटनाशक व शेतीपयोगी साहित्य ने-आण करण्याची परवानगी आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी दिली आहे. ई-पास मिळविणाºया नागरिकांना प्रवेश दिला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आष्टी येथे पोलीस अधिकारी व पाच कर्मचारी २४ तास ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळे विनापरवाना वाहनांची कडक तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. काही नागरिक रुग्णवाहिकेचा आधार घेऊन विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे रुग्णवाहिकेची कडक तपासणी केली जात आहे. येथील आंबेडकर चौकातही सीसीटीव्ही कॅमेरे यापूर्वीच लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे आवागमन वारंवार होत असेल तर अशा वाहनांवर पोलीस कारवाई करीत आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अवैध वाहतुकीचे चित्रीकरण केले जात आहे. ठाणेदार निर्मल हे कक्षातील टीव्हीमध्ये फुटेजची तपासणी करीत आहेत.

घाटकूर मार्गाच्या जिल्हा सीमेवर तगडा बंदोबस्त
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आष्टी येथे पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. याशिवाय घाटकूर मार्गे जाणाºया जिल्हा सीमेवरही तगडा पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे येथूनही नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिसांची करडी नजर चुकवून जिल्ह्यात प्रवेश करणाºया नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: CCTV cameras monitor illegal traffic in Ashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.