बसस्थानकात लागले सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:28 PM2018-02-03T23:28:41+5:302018-02-03T23:30:01+5:30

बसस्थानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर वॉच राहावा या उद्देशाने एसटी विभागाने गडचिरोली बसस्थानकात सुमारे नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांपूर्वी बसविले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे बसस्थानकावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

CCTV cameras started at bus station | बसस्थानकात लागले सीसीटीव्ही कॅमेरे

बसस्थानकात लागले सीसीटीव्ही कॅमेरे

Next
ठळक मुद्देगडचिरोली बसस्थानक : नऊ कॅमेऱ्यांचा राहणार वॉच

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बसस्थानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर वॉच राहावा या उद्देशाने एसटी विभागाने गडचिरोली बसस्थानकात सुमारे नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांपूर्वी बसविले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे बसस्थानकावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बसस्थानक परिसरात प्रवाशी, एसटी कर्मचाऱ्यांची दिवसभर गर्दी राहते. त्यामुळे चोरीसह इतर अनुचित घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत होती. एसटी महामंडळाने राज्यातील जिल्हा स्थळावर असलेल्या बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार गडचिरोली येथील बसस्थानकावर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेरे लावण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी केली. एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित केली. त्यानंतर मंगळवारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॅमेराची रेंज ८० मीटर आहे. आठ कॅमेरे फिक्स आहेत. तर एक कॅमेरा फिरणारा राहणार आहे. फिरणारा कॅमेरा बसस्थानकाच्या अगदी समोर डाव्या बाजूस लावण्यात आले आहे. या संपूर्ण कॅमेराचे चित्रीकरण बसस्थानक प्रमुखांच्या कक्षात दिसत आहे. प्रत्येक कॅमेराला १८० दिवसांचा बॅकअप देण्यात आला आहे. १८० दिवसांनंतर संबंधित कॅमेरातील डेटा दुसऱ्या सीडीमध्ये अपलोड केल्यानंतर डिलिट केला जाणारा आहे. सहा महिन्यांपूर्वीचा डेटा बघता येणार आहे.
फिरत्या कॅमेऱ्याची चौफेर नजर
बसस्थानकाच्या अगदी समोर डाव्या बाजूस फिरता कॅमेरा लावण्यात आला आहे. सदर कॅमेरा बसस्थानकाच्या समोरील भाग आपल्या नजरेत ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर कॅमेरा फिरता असल्याने बºयाचशा भागावर या कॅमेराची नजर राहणार आहे. बसस्थानकात चौकशी विभागासमोरही स्वतंत्र कॅमेरा बसविण्यात आला आहे. त्यामुळे घटनांवर नियंत्रण राहणार आहे.

Web Title: CCTV cameras started at bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.