ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:07 AM2018-11-22T01:07:15+5:302018-11-22T01:08:07+5:30
येथील बौद्ध स्तंभ झेंड्याजवळ ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बौद्ध समाज कोरची यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी बहुसंख्य मुस्लिम व बौद्ध बांधव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची/कुरखेडा : येथील बौद्ध स्तंभ झेंड्याजवळ ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बौद्ध समाज कोरची यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी बहुसंख्य मुस्लिम व बौद्ध बांधव उपस्थित होते.
मुस्लिम बांधवाकडून ईद-ए- मिलादुन्नबी उत्सव पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव कोरची येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळाच्या अध्यक्ष ज्योती भैसारे, सचिव छाया साखरे, भ्रष्टाचार निवारण समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष जितेंद्र सहारे, तालुका उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, तालुका संघटक सिद्धार्थ राऊत, शहरसचिव चेतन कराडे, शहर सरचिटणीस बंटी जनबंधू, सदस्य धम्मदीप लाडे, निखिल साखरे, चंदू वालदे, तसेच भारतीय बौद्ध महासभा कोरचीचे अध्यक्ष ओमराव टेंभुर्णे, उपाध्यक्ष चंद्रशेखर अंबादे, सचिव राहुल अंबादे, कोषाध्यक्ष रमेश सहारे, संघटक किशोर साखरे, नगरसेवक हिरा राऊत, शालिकराम कराडे, श्रावण अंबादे, हर्षलता भैसारे, सुमन अंबादे, पुनम अंबादे, जया सहारे, संगीता अंबादे, जयंत साखरे, जीवन भैसारे, ईश्वर साखरे, राजू टेंभुर्णे, बालक साखरे, केवल भैसारे उपस्थित होते.
कुरखेडा येथे जश्ने ईद मिलादुन्नबी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव निमित्त रॅली काढण्यात आली. मुस्लीम समाज व यंग मुस्लीम कमिटीच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने रॅली फिरविण्यात आली. रॅलीत मक्का मदनीच्या देखावासह अन्य देखावे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते. स्थानिक जामा मस्जीदमधून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅली आझाद चौक, आंबेडकर चौक, बाजारपेठ ते हनुमान मंदिर चौक, कुंभीटोला मार्गाने पुन्हा जामा मस्जिदमध्ये आणण्यात आली. येथे समाजाचे ज्येष्ठ सदस्य हाजी नवाब हाशमी यांच्या हस्ते धार्मिक ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जामा मस्जिद अध्यक्ष अयुब खान, ज्येष्ठ सदस्य अमानुल्लाह खान, जहांगीर खॉ पठान, हाजी मुर्तुजा अहेमद, हाजी मकसूद शेख, सलाम पटेल, हाजी सलीम खाणानी, हाजी समद खान, मुजफ्फर बारी, फिरोज मिस्त्री, नगर सेवक बबलू हुसैनी, यंग मुस्लीम कमिटीचे अध्यक्ष नगर सेवक उस्मान खान, आसीफ शेख, मकसूद खान, साजीद शेख, शमीम शेख, जमील शेख, ताहेर मुघल, शादाब खान, जियाउद्दीन सय्यद, समीर चांदवी, दानिश अंसारी, फाजील शेख व मुस्लिम बांधव हजर होते.