पोळा व गणेशोत्सव शांततेत पार पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:30+5:302021-09-06T04:40:30+5:30
सभेला पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पल्लवी वाघ, पोलीस हवालदार शालिकराम गिरडकर, संदीप भिवनकर, दिलीप चलाख, विनोद खोबे, आशिष पिपरे, ...
सभेला पोलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पल्लवी वाघ, पोलीस हवालदार शालिकराम गिरडकर, संदीप भिवनकर, दिलीप चलाख, विनोद खोबे, आशिष पिपरे, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे, विलास कुळमेथे, लोमेश बुरांडे, कालिदास बन्सोड, विनोद किरमे, छाया कोहळे, बबिता माहोरकर, संगीता साखरे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी चार फूट उंच व घरगुती उत्सवासाठी दोन फूट उंचीची मर्यादा आहे. पारंपरिक श्री गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. विसर्जन घरच्या घरी करावे, नजीकच्या स्थळी मूर्तीचे कृत्रिम विसर्जन करावे, जेणेकरून विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होणार नाही. बैलपोळा व तान्हापोळा सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध आहे. घरच्या घरीच बैलाची व नंदीबैलाची पूजा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनात ही सभा घेण्यात आली.
बॉक्स
पोलीस पाटील, गणेशमूर्तिकारांची व सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा घेऊन त्यांना कोरोना निर्बंध, सूचना व नियम याबाबत सभेत मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांना रक्तदान शिबिरे व आरोग्यविषयक शिबिरे, सामाजिक संदेश देणारी आराेग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरे घेण्याबाबत सांगण्यात आले.
050921\img_20210905_112100.jpg
शांतता समिती सभा फोटो