कढाेलीत गरजूंना भेटवस्तू देऊन महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:38+5:302021-03-09T04:39:38+5:30
वैरागड( वार्ताहर)- जागतिक महिला दिनानिमित्त श्री तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना ...
वैरागड( वार्ताहर)- जागतिक महिला दिनानिमित्त श्री तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण तसेच गरजू महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील नवनिर्वाचित सरपंच सोनी वटी व कढाेलीच्या सरपंच पारिका रंधे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एफ. एफ. मेहरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उराडीचे उपसरपंच राधेश्याम दडमल, प्रा. एस. एम. जुवारे, प्रा. प्रदीप बोडणे, प्रा. एम. व्ही बावनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नूतन चौधरी तर आभार निशा राऊत हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नृत्त्यागणा गायकवाड ,करिष्मा रंधे, सेजल चौधरी, काजल चंडीकार, करिष्मा वाढई, मेघा रंधे, अंकित कुथे, कार्तिक ढोले, स्वप्निल मडावी, गुलशन उसेंडी, गौरव मडावी, रोषण पुराम यांनी सहकार्य केले.
वैरागड येथील ग्रामपंचायत सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता पेंदाम ह्या होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्य शीतल सोमनानी , दीपाली ढेगरे, प्रतिमा बनकर, संगीता मेश्राम, गौरी सोमानानी, माधुरी बोडणे, योजना आत्राम, ज्योती आईटलवार, सरिता कावडे, विद्या कुलसंगे, वेणू दरडमारे, कल्पना बर्डे, गंगाबाई बावनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन वैशाली शिरसागर यांनी केले तर आभार अनुजा श्रीप्रेमार यांनी मानले.