आदर्श महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:29+5:302021-03-09T04:39:29+5:30
देसाईगंज: आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या हक्कांच्या चळवळीचे प्रतीक असून त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो. ...
देसाईगंज: आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या हक्कांच्या चळवळीचे प्रतीक असून त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो. सर्वत्र समाज उन्नत्ती घडवून आणायची असेल तर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व आर्थिक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळाले पाहिजे़, असे प्रतिपादन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. जयदेव देशमुख यांनी केले. ते आदर्श महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, रासेयो प्रमुख निहार बोदेले, प्रा. दीपिका शर्मा उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजही जगात महिला शिक्षण व आरोग्य संदर्भात मागासलेल्या आहेत. अलीकडे महिलांवरील हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत, त्यांना नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी अनेक बाबींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी जागृत करणे गरजेचे आहे.
यावेळी महिला सक्षमीकरण विभागाचे प्रमुख डॉ. हितेंद्र धोटे यांनीही महिला समानतेवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निहार बोदेले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रमेश धोटे यांनी मानले.