वृक्षाराेपणाने लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:58+5:302020-12-27T04:26:58+5:30

भामरागड : भामरागड येथील लाेकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन बुधवारी वृक्षाराेपणाने साजरा करण्यात आला. कर्मयोगी बाबा आमटे यांनी ४७ वर्षांपूर्वी ...

Celebrating the anniversary of Lokbiradari project with tree planting | वृक्षाराेपणाने लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन साजरा

वृक्षाराेपणाने लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन साजरा

Next

भामरागड : भामरागड येथील लाेकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन बुधवारी वृक्षाराेपणाने साजरा करण्यात आला. कर्मयोगी बाबा आमटे यांनी ४७ वर्षांपूर्वी २३ डिसेंबर १९७३ ला हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प नावाचे सेवाकेंद्र सुरू केले. समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या उभयतांची कर्मभूमी असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाने ४८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.यानिमित्तान पहिल्यांदाच वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वप्रथम स्व.बाबा आमटे व स्व.साधनाताई आमटे यांच्या प्रतिमांना डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे, प्रकल्पातील जुने कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरिफ शेख उपस्थित होते. दीप प्रज्ज्वलनानंतर ‘एक कुटुंब,एक झाड,’ या उपक्रमांतर्गत प्राणी अनाथालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये जारुळ,बकान, नागकेशर, रक्तचंदन, कडुनिंब, मोहा, नाद्रुक, घुगुरु,अर्जुन, सागरगोटा, शाहतूल, सीता, अशोक, सप्तपर्णी, नागचाफा, कार्डिया, बेल, आवळा, हलदू, सोनचाफा, हिरडा,बेहडा, चारोळी, पुत्रंजिवा, शिसू, शिसम, पापुलर आदी वृक्षांचा समावेश आहे. या राेपट्यांचे रोपण प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांनी केले. दरवर्षी २३ ते २६ डिसेंबरदरम्यान आश्रम शाळेचे शालेय स्नेहसंमेलन व शैक्षणिक गंमत जत्रेचे आयोजन असायचे. मात्र यावर्षी कोरोनामुळे शाळाही बंद आहेत. काेराेनाची लागण होऊ नये व शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, म्हणून यावर्षी अगदी साधेपणाने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. वर्धापनदिन विशेषांक निर्मितीसाठी कांचन गाडगीळ, दीपक सुतार, प्रा.गिरीश कुलकर्णी यांनी मोलाची कामगिरी बजावली. वृक्षारोपन कार्यक्रमाकरिता क्रीडा शिक्षक विवेक दुबे व चमूने अथक परिश्रम घेतले.

Web Title: Celebrating the anniversary of Lokbiradari project with tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.