क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:50+5:302021-01-08T05:56:50+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला राकाँ सामाजिक न्याय विभागाचे ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला राकाँ सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव संजय काेचे, सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला रामटेके, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जिल्हा सरचिटणीस याेगेश नांदगाये, इंद्रपाल गेडाम, जगन जांभुळकर, विवेक बाबनवाडे, विजय धकाते, रवींद्र गायकवाड, कपिल बागडे, विद्या सिडाम, मलय्या कालवा, शंकर दिवटे, इंदिरा उराडे, ज्याेती दातार, पूजा साखरे, संघमित्रा राजवाडे, पियरमणी एक्का, मनाेरमा गराडे, निर्मला टेंभुर्णे, सुमन टेंभुर्णे, शशिकला सहारे, गाैरी नैताम, काैशल्या उईके, अमन कराडे उपस्थित हाेते.
रांगी : काेरेगाव येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला बचत गटाच्या अध्यक्ष सुलाेचना राऊत, सचिव ज्याेती बावणे, मीनाक्षी मडावी, मीनाक्षी भाेंडे उपस्थित हाेते. यावेळी महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
औद्याेगिक प्रशिक्षण संस्था, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य संताेष साळुंके यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संचालन भास्कर मेश्राम यांनी केले. यावेळी गटनिदेशक व कर्मचारी उपस्थित हाेते.
फुले दाम्पत्य प्रतिष्ठान, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. गाेकुलनगर बायपास मार्ग व इंदिरा गांधी चाैकात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला कांता लाेनबले, मीना काेटरंगे उपस्थित हाेते. उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन चैताली चाैधरी तर आभार अल्का गुरनुले यांनी मानले. दरम्यान सांस्कृतिक भवन, वाचलनालय, वसतिगृह आदी बांधकामाचे भूमिपूजन कांता लाेनबले व मीना काेटरंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माळी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे, विद्यमान अध्यक्ष देवराव मोहुर्ले, फुले दाम्पत्य प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोटरंगे, पुरण पेटकुले, योगेश सोनुले, शंकर चौधरी, अशोक शेंडे, सुखदेव जेंगटे, हरिदास कोटरंगे, नरेंद्र निकोडे, आनंदराव कोटरंगे, सुशील कोटरंगे, संतोष मोहुर्ले, मंगला मांदाडे, ज्योती मोहुर्ले, ज्योती जेंगठे, संध्या भेंडारे, चैताली चौधरी, प्रभा सोनुले, मनीषा निकोडे, वंदना मोहुर्ले, मीना जेंगटे, चंदा गावतुरे, रजनी शेंडे, संध्या सोनुले, सारिका लोनबले उपस्थित हाेते. माळी समाज एटापल्ली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. चाैकातील अर्धकृती पुतळ्याला तसेच प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका रेखा माेहुर्ले, बालाजी माेहुर्ले, विस्तारी गावतुरे, गणपत माेहुर्ले, बंटी माेहुर्ले, हरिदास माेहुर्ले, बुधाजी शेंडे, नागाे लेनगुरे, विश्वनाथ माेहुर्ले, भाऊजी माेहुर्ले, नारायण गुरनुले, भारती माेहुर्ले, शुभांगी साेनुले, रंजना माेहुर्ले, गीता माेहुर्ले, भारती शेंडे, गाेपीका शेंडे उपस्थित हाेते.
मानापूर/देलनवाडी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी सरपंच माणिक पेंदाम, तंमुस अध्यक्ष हरबाजी घाेडमारे, सेवानिवृत्त प्राचार्य डी. के. मेश्राम, हेमराज टेंभुर्णे उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका रूपाली टेंभुर्णे, रेखा जांभुळे, अश्विनी ठवरे, पल्लवी कुमरे, वैशाली किरमे, शालिनी वाढणकर यांनी सहकार्य केले. किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, काेरेगाव : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामाेद्धार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भूषण अलामे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य ए. व्ही. बगमारे, अरूण राजगिरे, जगदीश केळझरकर, सुनील राऊत, व्ही. डी. सहारे, चंदू मडावी उपस्थित हाेते. उपस्थितांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त केले. संचालन एन. यू. मेश्राम यांनी केले.