कर्जाच्या ओझ्यात दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:02 AM2017-10-23T00:02:33+5:302017-10-23T00:02:44+5:30

दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

Celebrating Diwali in the shadow of debt | कर्जाच्या ओझ्यात दिवाळी साजरी

कर्जाच्या ओझ्यात दिवाळी साजरी

Next
ठळक मुद्दे२४ शेतकºयांना लाभ : सुट्यांमुळे पुढची प्रक्रिया थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. इतर शेतकºयांनी मात्र कर्जाचे ओझे मनावर ठेवतच दिवाळीचा सण साजरा केला आहे.
कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे केले होते. यानुसार अपवाद वगळता बहुतांश शेतकºयांनी अर्ज केले. सदर अर्ज पात्र ठरण्यासाठी शासनाने अनेक निकष घातले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पातळीवर संबंधित शेतकºयाच्या अर्जाची, कर्जाची व त्याच्या आर्थिक परिस्थितीची चाचणी केली जात आहे. एखादा शेतकरी शासनाच्या अटीनुसार पात्र असला तरी बँक किंवा गावातील नागरिकांनी आक्षेप घेतल्यास सदर शेतकºयाचा अर्ज नामंजूर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकºयांनी दिवाळी कर्जमुक्त व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांना दिवाळीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र सदर आश्वासन फोल ठरले असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी नाममात्र केवळ २४ शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. अगदी दिवाळीच्या एक दिवसाअगोदर पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन सदर शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इतर शेतकरी कर्ज माफ होणार की नाही, या विवंचनेत सापडले आहेत. अशा वातावरणातच त्यांनी दिवाळी साजरी केली आहे.
गुरूवारपासून शासकीय कार्यालयांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. त्यामुळे कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना अजून १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५० हजार ३०६ शेतकºयांनी अर्ज केला आहे. यापैकी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे अजूनपर्यंत गुलदस्त्यातच असल्याने कर्जाचे ओझे कायम आहे.

जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभार्थी
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागात शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून जिल्हा बँक शेतकºयांना कर्जाचे वितरण करते. राष्टÑीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेचे सर्वाधिक कर्जदार शेतकरी आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सर्वाधिक लाभ जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

कर्मचाºयांनीही भरले अर्ज
कर्मचाºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, त्याचबरोबर कर्जमाफीचा लाभ घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र याला न जुमानता अनेक कर्मचारी असलेल्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरला आहे. दबाव तंत्राचा वापर करून चावडी वाचनादरम्यान त्यांचे अर्ज पात्र सुद्धा ठरले आहेत. तहसीलदारांकडे तक्रार करण्याची मुदत आता संपली आहे. कर्मचाºयांच्या कर्जमाफीमुळे शासनाला लाखो रूपयांचा अनावश्यक चुना लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांचा शोध घेऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title: Celebrating Diwali in the shadow of debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.