पदस्पर्श दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:53 PM2018-05-03T23:53:57+5:302018-05-03T23:53:57+5:30

सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन सोहळा तथागत गौतम बुद्ध पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाचनालयाचे उद्घाटन सोहळा रविवारी देसाईगंज येथे पार पडला.

Celebration Day celebrated with excitement | पदस्पर्श दिन उत्साहात साजरा

पदस्पर्श दिन उत्साहात साजरा

Next
ठळक मुद्देदेसाईगंजात कार्यक्रम : गौतम बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श दिन सोहळा तथागत गौतम बुद्ध पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व वाचनालयाचे उद्घाटन सोहळा रविवारी देसाईगंज येथे पार पडला.
रविवारी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत परित्राण पाठ भंते बुद्धशरण, भंते धम्मज्योती, भंते चेटीयबोधी व भंते हेमानंद थेरो यांच्या वाणीतून पार पडले. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर दीक्षाभूमीत घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, विजय मेश्राम, संजय गणवीर, मारोती जांभुळकर, रमेश घुटके, अरविंद घुटके उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सिरोंचाचे सहायक स्थापत्य अभियंता नुबीर फुले, मूर्ती दानकर्ते भारत मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी वानखेडे यांच्या समाजप्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या हस्ते झाले. यावेळी लक्ष्मण नागदेवते, प्रमुख वक्त म्हणून दामोधर सिंगाडे व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता मेश्राम, ममता जांभुळकर, श्यामला राऊत, फुलझेबा डांगे, जयश्री लांजेवार यांच्यासह सदस्यांनी सहकार्य केले. सायंकाळी भोजनदान करण्यात आले.

Web Title: Celebration Day celebrated with excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.